फेसबुकची आठ वर्षे
जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइट असलेल्या फेसबुकने आपली आठ वर्षे पूर्ण केली आहेत.
ह्यूस्टन- जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइट असलेल्या फेसबुकने आपली आठ वर्षे पूर्ण केली आहेत. जगातील तब्बल आठ कोटी 45 लाख सक्रिय युझर्स असलेल्या फेसबुकने चार फेब्रुवारी रोजी आठ वर्ष पूर्ण केली.ह्यूस्टन येथे चार फेब्रुवारी 2004 रोजी मार्क झुकरबर्ग यांनी सुरु केलेल्या फेसबुक ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट आता इंटरनेट वापरणा-या प्रत्येकासाठीचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. इतक नव्हे तर वेगाने वाढणा-या फेसबुकच्या युझर्सची संख्या या वर्षी ऑगस्टपर्यंत 100 कोटी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ वर्षात केवळ इंटरनेटवरच मर्यादीत न राहता फेसबुकने सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
फेसबुक म्हटले की त्याचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग हे नाव समोर येते. असे असले तरी फेसबुकच्या निर्मितीमध्ये झुकरबर्ग यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. यामध्ये एदोआडरे सैवरिन, डस्टिन मॉस्कॉवित्ज आणि क्रिस ह्यूग्स यांचा ही समावेश आहे.
केवळ हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेल्या फेसबुकची लाट अल्पकाळावधीमध्येच अन्य महाविद्यालयात पोहचली. हा प्रतिसाद पाहून मार्कने फेसबुक सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आणि चार फेब्रुवारी २००४ रोजी फेसबुक हे डोमेन विकत घेण्यात आले.
फेसबुकच्या वाढीच्या वेगाबरोबरच मार्क झुकरबर्गला जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीच स्थान मिळाले. केवळ युझर्स पुरते मर्यादीत न राहणा-या फेसबुकने संवाद वाढवण्याबरोबरच व्यावसायीक यश देखील मिळवले.
एका अभ्यासानुसार अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 41 टक्के लोक फेसबुकचा वापर करतात. तर यंदाच्या वर्षी फेसबुकची भारतातील वाढ ही 132 टक्के इतकी होती. ही वाढ जगभरातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. तर तुर्की, चिली या देशातील एकूण इंटरनेट यूझर्सपैकी 80 टक्के फेसबुकचा वापर करतात.
आज आठ वर्षानंतर फेसबुकवर नवे मित्र बनवणे, स्टेटस अपडेट करणे, फोटो टॅग, त्यावर कॉमेटस् करणे या गोष्टी जगण्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे.
आठ वर्षाच्या फेसबुकने लवकरच आयपीओ आणण्याची तयारी सुरु केली आहे. 75 ते 100 अब्ज डॉलरचा हा आयपीओ फेब्रुवारीतच येण्याची चर्चा आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा