PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: जर्मनीच्या अध्यक्षपदी क्रिस्टियान वुल्फ जर्मनीच्या अध्यक्षपदी क्रिस्टियान वुल्फ ================================================================================ पीटीआय on 01 July, 2010 04:25:00 PM बर्लिन- जर्मनीचे 10वे अध्यक्ष म्हणून क्रिस्टियान वुल्फ यांची निवड झाली आहे. तीन फेरीमध्ये झालेल्या या निवडणुकीत वुल्फ यांनी विजय मिळवला आहे. फेडरल असेंबलीमधील एकूण सदस्यापैकी 625 मते वुल्फ यांना मिळाली. गेल्या महिन्यात अध्यक्ष हा‌र्स्ट कोएहलर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली होती.