PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: डिस्कव्हरी वाहिनीच्या ओलिसांची सुटका डिस्कव्हरी वाहिनीच्या ओलिसांची सुटका ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 12:50:00 PM वॉशिंग्टन- अमेरिकेच्या सिल्व्हर स्प्रिंग भागात डिस्कव्हरी वाहिनीच्या मुख्यालयात ओलीस ठेवण्यात आलेल्या तिघांची पोलिस अधिका-यांनी सुटका केली आहे. या तिघांना बंदुकाचा धाक देऊन ओलीस ठेवणा-याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. वाहिनीतील कर्मचा-यांना बंदुकाचा धाक दाखवून ओलीस ठेवणारा हा बंदुकधारी डिस्कव्हरी वाहिनीतच काम करत होता. डिस्कव्हरी वाहिनीवर दाखवण्यात येणा-या कार्यक्रमांबाबत तो निराश होता. हा बंदुकधारी जेम्स जे. ली आशिया वंशाचा होता. पोलिसांनी त्याच्याशी काही तास चर्चा केली. परंतु त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला असता त्याच्या अंगावरील स्फोटकांचा स्फोट झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. इमारतीतील सुमारे 1900 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. ली याने यापूर्वीही वाहिनीच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली होती. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.