ओबामांना हवा आणखी एक कार्यकाळ
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याला पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी असा दावा केला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याला पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी असा दावा केला आहे.
अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणा-या निवडणुकीसाठी ओबामा पुन्हा एकदा रिंगणात आहेत. ओबामांनी निवणुकीची तयारी सुरु केली असून एनबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अध्यक्षपदाची आणखी एक संधी मिळाली पाहिजे असे सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर आपल्याला पुन्हा एकदा अध्यक्ष व्हावे लागेल असे त्यांनी 2009मधील एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आणखी एक कार्यकाळ हवा असे सांगितले.
ओबामांनी आपल्या मागील काही मुलाखतीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये होणा-या सुधारणे संदर्भातील आकडेवारी सांगितली होती. अमेरिकेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळेच परदेशात अमेरिकेत निर्माण झालेल्या वस्तूची विक्री वाढली आहे. या काळातच अमेरिकेच्या प्रगतीसाठी योग्य दिशा ठरवणे गरजेचे असल्याचे ओबामांनी सांगितले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा