PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश सैबेरियात विमान अपघात; 31 ठार ================================================================================ पीटीआय on 02 April, 2012 12:00:00 PM रशियाचे प्रवासी विमान सोमवारी सायबेरियात अपघातग्रस्त होऊन किमान 31 प्रवासी ठार झाले आहेत. हा विजय जनतेचा- आँग सान ================================================================================ पीटीआय on 02 April, 2012 01:20:00 PM म्यानमानमध्ये झालेल्या झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी या पक्षाला एका जागेवर मिळालेला विजय हा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया मानवाधिकार कार्यकर्त्या आँग सांन स्यू ची यांनी व्यक्त केली आहे. म्यानमारमध्ये आँग सान सू ची विजयी ================================================================================ पीटीआय on 02 April, 2012 12:40:00 PM म्यानमारमधील पोटनिवडणुकीत नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू ची विजयी झाल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. भारतीय संकेतस्थळांवर चिनी हॅकर्सचे हल्ले ================================================================================ पीटीआय on 31 March, 2012 11:12:00 PM भारताच्या लष्करी संशोधन संस्था आणि तिबेटी कार्यकर्त्यांच्या संकेतस्थळांवर प्रामुख्याने चिनी हॅकर्स हल्ले करत आहेत, असे जपानमधील संगणक सुरक्षाविषयक संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. म्यानमारमध्ये रविवारी मतदान ================================================================================ पीटीआय on 31 March, 2012 06:50:00 PM म्यानमारमध्ये रविवारी होणा-या पहिल्या लोकशाही निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून लोकशाहीच्या पुरस्कर्त्यां आन सान सू की या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. लादेनची पाकिस्तानात पाच घरे? ================================================================================ पीटीआय on 30 March, 2012 01:40:00 PM अल कईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनची पाकिस्तानमध्ये पाच घरे व चार मुले आहेत, अशी माहिती लादेनच्या पत्नीने चौकशीत दिली आहे. ड्रोन हल्ल्यात चार दहशतवादी ठार ================================================================================ पीटीआय on 30 March, 2012 12:30:00 PM पाकिस्तानातील वायव्य सरहद्दीवर असलेल्या आदिवासी भागात अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा अधिका-यांनी दिली. कॅमेरॉन यांचे ‘मरियाना गर्ता’मधील धाडस ================================================================================ पीटीआय on 30 March, 2012 02:30:00 AM कॅमेरॉन यांनी प्रशांत महासागरात सुमारे सात मैल खोलीवर जाण्यासाठी विशेष प्रकारची रचना असलेल्या एक व्यक्ती बसू शकेल, अशा पाणबुडीचा वापर केला. ‘डीप सी चॅलेंजर’ नावाच्या पिवळ्या रंगाच्या 12 टन वजनाच्या पाणबुडीतून ते तळापर्यंत पोहोचले. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या सहकार्याने ही मोहीम आखण्यात आली होती. अफगणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट ================================================================================ वृत्तसंस्था on 29 March, 2012 12:50:00 PM अफगणिस्तानमधील जलालाबाद येथे असलेल्या भारतीय दूतावासापासून एक किमी अंतरावर असलेल्या मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. गुगलचे डुडल जर्मनवास्तु विशारदला समर्पित ================================================================================ प्रहार वेब टीम on 27 March, 2012 03:51:00 PM जर्मनीमधील प्रसिद्ध वास्तुविशारद असलेल्या मीज वॅन डेर रोहे यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त हे गुगलचे डुडल समर्पित केले आहे.