भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यावर भर
भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत दोन दिवसांच्या बैठकीला सोमवारपासून सुरुवात झाली.
इस्लामाबाद-भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत दोन दिवसांच्या बैठकीला सोमवारपासून सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या संयुक्त कार्यकारिणी गटातील वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले आहेत. 2007 ला दोन्ही देशातील परराष्ट्र सचिवांनी आण्विक तसेच संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही देशातील वरिष्ठ अधिकारी एकत्र येत आहेत.
भारताच्यावतीने निशस्त्रकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहाराचे महासंचालक डी. बाला वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ तर पाकिस्तानच्यावतीने अतिरिक्त सचिव मुनावर सईद भट्टी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.
सोमवारी होणा-या बैठकीत दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याबाबत चर्चा केली जाणार आहे तर मंगळवारी आण्विक विषयावर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, क्षेपणास्त्र चाचण्या आणि दोन्ही देशातील व्यापार वाढीच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे.
अमेरिका आणि फ्रान्सने भारताबरोबर केलेल्या नागरी अणू सहकार्य करारांच्या धर्तीवरच भारतानेही पाकिस्तानबरोबर नागरी अणू सहकार्य करार करावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे माहीतगारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जपानमधील फुकूशिमा अणू दुर्घटनेप्रमाणे दुर्घटना होऊ नये, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा