कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याची हत्या
भारतीय वंशाच्या अलोक गुप्ता (27) या विद्यार्थ्याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
टोरेंटो- भारतीय वंशाच्या अलोक गुप्ता (27) या विद्यार्थ्याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या आठवड्यातच इंग्लडमध्ये पुण्याच्या अनुज बिडवेची हत्या झाली होती.
पश्चिम कॅनडा येथील सुरे शहरामध्ये आलोक रहात होता. क्वातलेन विद्यापीठात व्यवसाय प्रशासन विषयात उच्चशिक्षण घेत होता. नाताळनिमित्त सुट्टी असल्याने शहरातील केन्स ग्रोसरी स्टोअरच्या मालकाला आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करता यावा या हेतूने अलोक तिथे नोकरी करत होता. तो दुकानात असताना अनोळखी व्यक्ती आली आणि आलोकवर बेछूट गोळीबार केला.गोळीबारमुळे जखमी झालेल्या अलोकने बाजूला असलेल्या दुकानात मदतीची विनंती केली. त्यानंतर या दुकानदाराने आणि तिथल्या काही नागरिकांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो मरण पावला.
अलोकच्या हत्येबाबात कुटुंबियांना कळवण्यात आले असून त्यांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती त्याचा मेव्हणा नितीन भुतानी याने दिली. अलोकचा खून करणा-यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
दरम्यान, प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केली नसून तपास सुरू आहे. एखाद्या टोळीचे हे कृत्य नसावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा