कयानी, पाशा यांना पदावरून दूर करणार?
अमेरिकेची मदत मागणारे मेमो प्रकरण उघड झाल्याप्रकरणी पाकिस्तानचे लष्करप्रमुख अशफाक परवेज कयानी आणि आयएसआयप्रमुख अहमद शुजा पाशा यांना पदावरून दूर करण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत असल्याचा दावा एका वर्तमानपत्राने केला आहे.
इस्लामाबाद-अमेरिकेची मदत मागणारे मेमो प्रकरण उघड झाल्याप्रकरणी पाकिस्तानचे लष्करप्रमुख अशफाक परवेज कयानी आणि आयएसआयप्रमुख अहमद शुजा पाशा यांना पदावरून दूर करण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत असल्याचा दावा एका वर्तमानपत्राने केला आहे.
लष्करप्रमुख कयानी आणि आयएसआयप्रमुख पाशा यांच्यावर सरकार मोठ्या प्रमाणात नाराज आहे. नाटो हल्ल्यात 24 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्यानंतर अमेरिका आणि नाटोविरोधात अत्यंत कठोर पावले उचलण्यास यांनीच पाकिस्तानला भाग पाडले. त्याचबरोबर अमेरिकेकडे पाकिस्तानातील संभाव्य लष्करी बंडाविरोधात मदत मागण्याची पाळी या दोघांमुळे निर्माण झाल्याचे वृत्त ‘द न्यूज डेली’ या वर्तमानपत्राने दिले आहे. मेमो प्रकरणामुळे सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पक्षासमोर मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे या दोघांनाही पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोघांना पदावरून दूर केल्यावर पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, लष्कर आणि आयएसआय या दोघांना बडतर्फ करण्याच्या निर्णयाकडे कसे पाहील, याची कल्पना करवत नाही, असेही वर्तमानपत्राने म्हटले आहे.
दरम्यान, मेमो प्रकरणावरून पाकिस्तान सरकारने संरक्षण सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरून न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितले आहे. त्यासाठी सरकारने लष्करप्रमुख कयानी यांचे निकटवर्तीय समजले जाणा-या संरक्षण सचिव खालिद नईम लोधी यांना सरकारने नोटीस बजावून माहिती मागवली आहे. संरक्षण मंत्र्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता ही नोटीस बजावण्यात आली आहे.
या आधीही पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी लोधी यांना सरकारची बाजू सर्वोच्च न्यायायलात मांडण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश न पाळल्याबद्दल लष्करावर गिलानी यांनी जहरी टीका केली होती.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा