जगात इस्लाम धर्माबाबत खूपच गैरसमज- खार
अशिक्षीत आणि बेजबाबदार लोकांच्या हातात इस्लाम धर्माची सूत्रे सोपवली गेल्याने जगात या धर्माबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत,’’ असे वादग्रस्त विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केले.
दावोस- ‘‘अशिक्षीत आणि बेजबाबदार लोकांच्या हातात इस्लाम धर्माची सूत्रे सोपवली गेल्याने जगात या धर्माबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत,’’ असे वादग्रस्त विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केले.
जागतिक अर्थ मंचने (डब्ल्यूईएफ) आयोजित केलेल्या ‘लोकशाही’ या विषयावरील चर्चासत्रात खार बोलत होत्या. ‘‘जगात इस्लाम धर्माबाबत चुकीचे चित्र निर्माण झाले आहे. महिलांचा आदर करा, अशी शिकवण इस्लाम धर्माने दिली आहे, त्याशिवाय इस्लामने प्रबळ लोकशाहीचाही पुरस्कार केला आहे. पाकिस्तानात गेल्या दहावर्षापासून लोकशाही नांदत आहे, हेच याचे उत्तम उदाहरण आहे, असे खार यांनी सांगितले. इस्लाम आणि लोकशाही या दोन्हीही परस्परविरोधी नसून एकमेकांचे समर्थन करणा-या शक्ती आहेत. मात्र तसा आभास निर्माण केला जात आहे. इस्लामची सूत्रे योग्य व्यक्तींच्या हातात गेल्यास या धर्माबाबत असलेले सर्व गैरसमज दूर होतील, असा विश्वास खार यांनी व्यक्त केला.Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा