PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तानातील कोर्टाचे कसाबविरुद्ध वॉरंट पाकिस्तानातील कोर्टाचे कसाबविरुद्ध वॉरंट ================================================================================ पीटीआय on 10 July, 2010 08:50:00 PM इस्लामाबाद- मुंबई दहशतवादी हल्ल्यांसदर्भात पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या संशयितांवरील खटल्याची सुनावणी करणा-या दहशतवादविरोधी न्यायालयाने हल्ल्यादरम्यान जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब आणि फहीम अन्सारी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. न्यायाधिश मलिक मोहम्मद अकरम अवान यांनी हा अटर वॉरंट जारी केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी अजमल कसाबला पाकिस्तानमध्ये पाठवता येणार नसल्याचे भारत सरकराने स्पष्ट केल्याचे अभियोग पक्षाने न्यायालयात तिन जुलै रोजी सांगितले होते. मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या लष्कर ए तय्यबा संघटनेचा प्रमुख झकी-उर-रहमान लखवीने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.