पहिले पान | विदेश | पाकिस्तानमधून 100 मच्छीमारांची मुक्तता

पाकिस्तानमधून 100 मच्छीमारांची मुक्तता

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानमधील तुरुंगात शिक्षा पूर्ण झालेल्या 100 भारतीय मच्छीमारांना गुरुवारी मुक्त करण्यात आले.

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील तुरुंगात शिक्षा पूर्ण झालेल्या 100 भारतीय मच्छीमारांना गुरुवारी मुक्त करण्यात आले. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने 100 भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. शिक्षा पूर्ण झालेल्या 442 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानमधील तुरुंगातून मुक्तता करण्यात येणार आहे. चार आणि सहा सप्टेंबर रोजी अन्य मच्छीमारांची मुक्तता केली जाणार आहे.

मासेमारी करताना सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्याने या भारतीय मच्छीमारांना अटक करण्यात आले होते. यामधील बहुतेक मच्छीमार गुजरातमधील होते.  

शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही अनेक मच्छीमारांची तुरुंगातून सुटका केली जात नसल्याने  काही सामाजिक संस्था आणि मानवधिकार संघटनांनी पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0