PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाकिस्तानमधून 100 मच्छीमारांची मुक्तता पाकिस्तानमधून 100 मच्छीमारांची मुक्तता ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 08:45:00 PM इस्लामाबाद- पाकिस्तानमधील तुरुंगात शिक्षा पूर्ण झालेल्या 100 भारतीय मच्छीमारांना गुरुवारी मुक्त करण्यात आले. 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने 100 भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. शिक्षा पूर्ण झालेल्या 442 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानमधील तुरुंगातून मुक्तता करण्यात येणार आहे. चार आणि सहा सप्टेंबर रोजी अन्य मच्छीमारांची मुक्तता केली जाणार आहे. मासेमारी करताना सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्याने या भारतीय मच्छीमारांना अटक करण्यात आले होते. यामधील बहुतेक मच्छीमार गुजरातमधील होते.   शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही अनेक मच्छीमारांची तुरुंगातून सुटका केली जात नसल्याने  काही सामाजिक संस्था आणि मानवधिकार संघटनांनी पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.