भारत मित्र, तर पाकिस्तान जुळा भाऊ- करझाई
भारत हा अफगाणिस्तानचा मित्र आहे, तर पाकिस्तान सयामी जुळा भाऊ आहे, अशा शब्दांत अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी दोन्ही देशांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
इस्लामाबाद- भारत हा अफगाणिस्तानचा मित्र आहे, तर पाकिस्तान सयामी जुळा भाऊ आहे, अशा शब्दांत अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी दोन्ही देशांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. करझाई सध्या पाकिस्तान दौ-यावर आहेत.
अफगाणिस्तानात भारतीय मोठ्या संख्येने असल्याबाबत पाकिस्तानने अलिकडेच चिंता व्यक्त केली होती. मात्र अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर शेजारी देशांविरोधातील कारवायांसाठी कदापि होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही करझाई यांनी यासंदर्भात दिली.
"भारत हा अफगाणिस्तानचा जवळचा मित्र आहे. मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे नाते जुळ्या भावांहूनही जवळचे आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानचा सयामी जुळा भाऊ आहे. या दोन देशांत कधीच अंतर पडणार नाही," असे करझाई यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नमूद केले.
भारत हाही अफगाणिस्तानचा अत्यंत जवळचा मित्र असून भारताने अफगाणिस्तानच्या फेरबांधणीसाठी खूप मदत केली आहे, असे करझाई यांनी सांगितले.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा