PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: काँगोत तेलाच्या ट्रकला आग, दोनशे मृत्युमुखी काँगोत तेलाच्या ट्रकला आग, दोनशे मृत्युमुखी ================================================================================ पीटीआय on 03 July, 2010 10:35:00 PM किन्शासा- काँगो प्रजासत्ताकातील एका खेड्यात शुक्रवारी तेलाने भरलेला एक ट्रक उलटून लागलेल्या आगीत किमान दोनशे जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. रेडक्रॉस संघटनेने शनिवारी ही माहिती दिली. टांझानियामधून आलेला एक ट्रक सांग नावाच्या खेड्यात उलटला. त्यामुळे तेल गावात पसरून आग लागली, असे प्रादेशिक सरकारचे प्रवक्ते व्हिन्सेंट काबांगा यांनी सांगितले. सांग गावातील बहुसंख्य घरे माती आणि बांबूची असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. ट्रक भरधाव वेगाने जात असल्यानेच उलटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.