PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भारतीय वंशाच्या डॉक्टरला सात वर्षे कारावास भारतीय वंशाच्या डॉक्टरला सात वर्षे कारावास ================================================================================ पीटीआय on 01 July, 2010 06:15:00 PM मेलबर्न- शस्त्रक्रियेतील हलगर्जीमुळे तीन रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय वंशाचा शल्यविशारद डॉ. जयंत पटेल याला ब्रिस्बेन येथील न्यायालयाने गुरुवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. पटेल याने शस्त्रक्रिया केलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर एका रुग्णाला कायमचे अपंगत्व आले होते. क्वीन्सलँड येथील रुग्णालयात कार्यरत असताना 2003 ते 2005 या काळात पटेलने या शस्त्रक्रिया केल्या होत्या. क्वीन्सलँड राज्यातील सर्वोच्च न्यायालयाने पटेलला ही शिक्षा सुनावली आहे. हलगर्जी शस्त्रक्रियांबद्दल पटेलवर 25 वर्षांपूर्वीही आरोप झाले होते.