PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मेक्सिकोमध्ये गोळीबारात १४ ठार मेक्सिकोमध्ये गोळीबारात १४ ठार ================================================================================ एजन्सी on 01 February, 2010 03:15:00 PM क्युदाद ज्युरेझ- मेक्सिकोमधील एका वाढदिवसाच्या पार्टीत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या बेछूट गोळीबारात १४ मुलांचा मृत्यू झाला आहे. अमली पदार्थाची तस्करी करणा-या माफिया गटाकडून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. येथील एका शाळेतील विद्यार्थ्याच्या पार्टीत रविवारी सकाळी हा गोळीबार झाला, असे अटर्नी जनरल पेट्रीशिया गान्जालज यांनी सांगितले. गोळीबारात ठार झालेले सर्व जण १५ ते २० वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमागे अमली पदार्थांची तस्करी करणा-या गटाचा हात आहे का, याचा तपास सुरु असल्याचे पेट्रीशिया यांनी सांगितले.