बांगलादेशात सत्तांतराचा अयशस्वी प्रयत्न
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार उलथवून टाकण्याचा लष्करातील काही अधिका-यांनी रचलेला कट हाणून पाडण्यात आल्याची माहिती गुरुवारी लष्करी प्रवक्त्यांनी दिली.
ढाका- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार उलथवून टाकण्याचा लष्करातील काही अधिका-यांनी रचलेला कट हाणून पाडण्यात आल्याची माहिती गुरुवारी लष्करी प्रवक्त्यांनी दिली. याप्रकरणी लष्कराच्या दोन माजी अधिका-यांना ताब्यात घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशातील लोकशाही सरकार उलथवून टाकण्याचा कट लष्करातील सेवेत असलेले सुमारे 14 ते 16 अधिकारी रचत असल्याची माहिती मिळाली. या कटात बांगलादेशाच्या लष्करातील एक लेफ्टनंट कर्नल आणि निवृत्त मेजर आणि अनिवासी बांगलादेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले. . हे सर्वजण मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून बंडाचा कट रचत होते. त्यांच्यावर लष्कराची पाळत होती आणि वेळीच खबरदारी घेतल्याने कट उधळण्यात आला, असे लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल मोहम्मद मसूद रझ्झाक यांनी सांगितले. या कटात सहभागी असलेला मेजर सईद मोहम्मद झिया उल हक नावाचा अधिकारी फरारी असून त्याचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा