पहिले पान | विदेश | बेपत्ता भारतीयाचा तपास टॅक्‍सी चालकावर केंद्रित

बेपत्ता भारतीयाचा तपास टॅक्‍सी चालकावर केंद्रित

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

मँचेस्टर येथून 2 जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या गुरदीप हायेर (वय 20) या भारतीयाचा तपास आता टॅक्‍सी चालकावर केंद्रित झाला असल्याची माहिती ब्रिटिश पोलिसांनी सोमवारी दिली.

लंडन- मँचेस्टर येथून 2 जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या गुरदीप हायेर (वय 20) या भारतीयाचा तपास आता टॅक्‍सी चालकावर केंद्रित झाला असल्याची माहिती ब्रिटिश पोलिसांनी सोमवारी दिली. नाईट क्‍लबबाहेर त्याने भाड्याने केलेल्या टॅक्‍सीच्या चालकाकडून महत्त्वाची माहिती मिळू शकेल असा दावा मँचेस्टर पोलिसांनी केला आहे.

अनुज बिडवेची हत्या झाली तेथून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाईट क्‍लबमध्ये 31 डिसेंबरची रात्र साजरी करण्यासाठी गुरदीप आला होता. 1 जानेवारी रोजी तो तेथून बाहेर पडला. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याचे समजते.

नाईट क्‍लबबाहेर आल्यावर गुरदीपने मध्यरात्री 2.15 वाजता एक टॅक्‍सी भाड्याने केली होती. मात्र फक्त आठ मिनिटांनी ती टॅक्‍सी नाईट क्‍लबजवळ परतली. त्यावेळी टॅक्‍सीत गुरदीप नव्हता. त्यामुळे याप्रकरणाचा तपास त्या टॅक्‍सी चालकाभोवती केंद्रित झाला आहे. टॅक्‍सी चालकाची ओळख पटवण्यासाठी आणि त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आल्याचे मँचेस्टर पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी गुरदीपचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून कोणाला गुरदीप आणि त्या टॅक्सी चालकाबाबत काही माहीती असल्यास मँचेस्टर पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0