म्यानमारमध्ये गोदामात स्फोट, 17 ठार
म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यंगोन येथे एका गोदामात झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाल्याचे अधिका-यांनी गुरुवारी सांगितले.
यंगोन- म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यंगोन येथे एका गोदामात झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाल्याचे अधिका-यांनी गुरुवारी सांगितले. या स्फोटात 79 लोक जखमी झाले आहेत. मात्र हा बॉम्बस्फोट नसल्याचे सांगण्यात आले.
हा बाँबस्फोट नव्हता मात्र, या स्फोटामुळे मोठी आग लागल्यामुळे त्याची झळ गोदामासह आसपासच्या घरांनाही बसला असे अधिकारी म्हणाले.
स्फोट आणि आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली.
स्फोट व आगीमुळे 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अग्निशमन जवानांचाही समावेश आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा