पहिले पान | विदेश | ओबामा सरकारमधील चोप्रा यांचा राजीनामा

ओबामा सरकारमधील चोप्रा यांचा राजीनामा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

ओबामा सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञानात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे भारतीय अनीश चोप्रा यांनी तीन वर्षाच्या सेवेनंतर पदाचा राजीनामा दिला.

वॉशिंग्टन-ओबामा सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञानात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे भारतीय अनीश चोप्रा यांनी तीन वर्षाच्या सेवेनंतर पदाचा राजीनामा दिला. अमेरिकेच्या प्रशासनातील ते पहिलेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि सर्वोच्च पदावरील भारतीय वंशाचे अमेरिकन होते. नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात तसेच प्रशासनाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अनीश यांचा मोलाचा वाटा आहे. राजकारणात भवितव्य आजमावण्यासाठी अनीष यांनी राजीनामा दिल्याचे माहितगारांकडून सांगण्यात येत आहे.

 

अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात अनीश यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ग्रामीण भागात ब्रॉडबँडची कक्षा वाढवणे, सरकारी नोंदी अद्ययावत करणे यासारख्या कामात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा अमेरिकेतील जनतेला निश्चितच फायदा होईल असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पत्रकात म्हटले आहे.

 ओबामा यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत अनीश यांनी ओबामा यांचे आभार मानले आहे. तसेच या क्षेत्रात अजून आपल्याला बरेच संशोधन करायचे आहे असे अनीश यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0