फिलीपिन्समध्ये भूकंप;44 ठार
फिलीपिन्सला सोमवारी सकाळी 11.49 वाजता 6.8 एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला असून आतापर्यंत 44 जण ठार झाले आहेत..
मनिला- फिलीपीन्समधील तिस-या क्रमांकाच्या सर्वात मोठय़ा बेटावर सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान 44 जण मरण पावले. यामध्ये मोठय़ा संख्येने शाळकरी मुलांचा समावेश होता. 6.8 रिश्टर क्षमतेच्या या हादऱ्यामुळे इमारती कोसळल्या तर अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला. या भूकंपानंतर ताबडतोब सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. फिलीपीन्समधील नेग्रोस बेटावरील किनारपट्टीलगतच्या सिटी ऑफ डुमागेटेपासून 70 किमी.वर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने सांगितले. मरण पावलेल्यांमध्ये दोन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, असे वृत्त फिलीपीन्सच्या वृत्तसंस्थेने दिले आहे. या शाळा पूर्णपणे कोसळल्याने त्याखाली दबून या मुली दगावल्या,अशी माहिती पोलिसांनी दिली. भूकंपाच्या या शक्तिशाली हाद-यानंतरही भूकंपपश्चात हादरे बसत होते व त्यातील एकाची क्षमता 6.2 रिश्टर असल्याची नोंद झाल्याचे फिलीपीन्सच्या आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांनी सांगितलेMarathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा