नायेजिरियातील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू
नायेजिरियात पोलिस आणि सरकारी कार्यालयांवर होत असलेल्या बॉँबहल्ल्यात केवलकुमार कालीदार राजपूत या भारतीयाचा मृत्यू झाला आहे.
अबुजा- नायेजिरियात पोलिस आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करून करण्यात येत असलेल्या बॉँब हल्ल्यात केवलकुमार कालीदार राजपूत (23) या भारतीयाचा मृत्यू झाल्याची माहिती रविवारी भारतीय दूतावासाने दिली. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.
नायजेरियात शरिया कायदा लागू करावा, या मागणीसाठी बोको हाराम या कट्टर इस्लामी पंथाने शनिवारी कानो शहरातील अनेक ठिकाणी अत्यंत योजनाबद्ध रीतीने गोळीबार आणि बॉम्बस्फोटांची मालिका घडवली. या हिंसाचारात आतापर्यंत 162 जण ठार झाले आहेत. यामध्ये भारतीय वंशाचा केवलकुमार कालीदार राजपूत (23) याचा समावेश आहे. ते गुजरातमधील दाधोड येथील आहे. तसेच या हल्ल्यात दोन लहान मुलांसहीत सहा भारतीय वंशाचे नागरिक जखमी झाले आहेत.
राजपूत हे कानो येथील मेसर्स रेलकेम कंपनीमध्ये मार्च 2011 पासून कार्यरत असल्याची माहिती भारतीय दुतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. राजपूत आणि त्यांचे सहकारी गाडीतून कानो येथून जात असताना हल्लेखोरांनी केलेल्या राजपूत यांच्यासह नेपाळी वंशाचे असलेले त्यांचे सहकारी हरीप्रसाद भुसाल, राजसिंह ठार झाले. याशिवाय हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यांत इमारत कोसळून दोन लहानग्या मुलांसह सहा भारतीय नागरिक ढिगा-याखाली अडकून जबर जखमी झाले आहेत. त्यांना कानो येथील रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.
हल्लेखोरांनी सरकारी इमारती आणि पोलिस ठाण्यांना या हल्ल्यात लक्ष्य केले आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात 24 तासांसाठी जमावबंदीचे आदेश लागू कऱण्यात आले आहेत. या हल्ल्यात आत्तापर्यंत सुमारे 162 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा