पहिले पान | विदेश | गुरशरन हत्या खटल्याची सुनावणी 29 जूनला

गुरशरन हत्या खटल्याची सुनावणी 29 जूनला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गुरशरन सिंग हत्या खटल्याची सुनावणी ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने 29 जूनपर्यंत स्थगित केली आहे.

मेलबर्न- गुरशरन सिंग हत्या खटल्याची सुनावणी येथील न्यायालयाने 29 जूनपर्यंत स्थगित केली आहे. गुरशरन सिंग या तीन वर्षांच्या बालकाची हत्या केल्याप्रकरणी गुरुसेवक ढिल्लन या भारतीय युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुसेवकविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी सरकारी पक्षाने वेळ मागितल्यामुळे खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मिळाली आहे. गुरुसेवक जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

व्यवसायाने टॅक्सीचालक असलेल्या गुरसेवकवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अधिक पुरावे गोळा करता यावे अशी विनंती सरकारी पक्षाने केली. न्यायदंडाधिकारी जेलेना पोपोविक यांनी ही विनंती मान्य करत खटल्याची सुनावणी 29 जूनपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले.  

पाच दिवसांपूर्वी गुरुसेवकने त्याच्या टॅक्सीमध्ये गुरशरणनला बंद करून ठेवले होते. इतकेच नाही तर तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला तीन तास टॅक्सीतून फिरवल्यानंतर त्याला जंगलात फेकून दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0