PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: गुरशरन हत्या खटल्याची सुनावणी 29 जूनला गुरशरन हत्या खटल्याची सुनावणी 29 जूनला ================================================================================ पीटीआय on 09 March, 2010 03:55:00 PM मेलबर्न- गुरशरन सिंग हत्या खटल्याची सुनावणी येथील न्यायालयाने 29 जूनपर्यंत स्थगित केली आहे. गुरशरन सिंग या तीन वर्षांच्या बालकाची हत्या केल्याप्रकरणी गुरुसेवक ढिल्लन या भारतीय युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुसेवकविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी सरकारी पक्षाने वेळ मागितल्यामुळे खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मिळाली आहे. गुरुसेवक जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. व्यवसायाने टॅक्सीचालक असलेल्या गुरसेवकवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अधिक पुरावे गोळा करता यावे अशी विनंती सरकारी पक्षाने केली. न्यायदंडाधिकारी जेलेना पोपोविक यांनी ही विनंती मान्य करत खटल्याची सुनावणी 29 जूनपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले. पाच दिवसांपूर्वी गुरुसेवकने त्याच्या टॅक्सीमध्ये गुरशरणनला बंद करून ठेवले होते. इतकेच नाही तर तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला तीन तास टॅक्सीतून फिरवल्यानंतर त्याला जंगलात फेकून दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.