पहिले पान | विदेश | पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवट?

पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवट?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

संरक्षण सचिव खालीद लोधी यांच्या हकालपट्टीमुळे सरकार आणि लष्करामधील तणाव वाढला असून पाकिस्तानमध्ये लष्करी राजवटीची शक्यता आहे.

इस्लामाबाद- मेमो प्रकरणावरून पाकिस्तान सरकार आणि लष्करातील बेबनावात आणखी भर पडली असून लष्करप्रमुख कयानी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संरक्षण सचिव लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालीद नईद लोधी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. लोधी यांच्या हकालपट्टीमुळे सरकार आणि लष्कर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लष्करी राजवट येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी ही कारवाई केली. परिस्थिती नीट न हाताळणे आणि बेकायदेशीर कारवाई केल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधानांच्या अखत्यारित असणा-या सर्वच संवेदनशील संस्थांमध्ये लोधी यांनी गैरसमजूत निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मंत्रिमंडळ सचिव नर्गीस सेठी यांच्याकडे संरक्षण सचिव पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या याप्रकाराबद्दल लष्कर प्रमुखांनी प्रखर विरोध केला असून सरकारने खूपच कडक पावले उचलली असल्याची प्रतिक्रीय त्यांनी व्यक्त केली आहे.

लष्करप्रमुख अशफाक परवेझ कयानी व आयएसआय प्रमुख लेफ्टनन जनरल अहमद शुजा पाशा यांनी याचे गंभीर परिणाम होतील असे आव्हानच सरकारला दिले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0