पहिले पान | विदेश | गिलानींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

गिलानींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना न्यायालयाने नोटीस बजावली असून 13 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

इस्लामाबाद- न्यायालयाच्या अवमानप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून 13 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गिलानी न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर त्यांच्यावर अधिकृतरित्या आरोपपत्र दाखल करण्यात येईल व त्यानंतर त्यांच्यावर अवमानप्रकरणी खटला चालवण्यात येईल असे संकेतही न्यायालयाने दिले आहेत.

नेत्यांविरोधातील बंद केलेले खटले पुन्हा चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर गिलानी यांनी आक्षेप घेत बंद खटले सरकार पुन्हा चालवू शकत नाही असे मत व्यक्त केले होते.गिलानी यांच्या या वक्तव्यामुळे तसेच पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई सुरू न केल्यामुळे गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते तसेच त्यांना न्यायालयाने अवमान नोटिस बजावली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गिलानी यांनी कोणत्याही प्रकारचा अवमान केला नसून त्यांना न्यायालच्या निर्णयाचा आदर असल्याचा युक्तीवाद गिलानी यांचे वकील ऐतजाज एहसान यांनी गुरुवारी केला.

मात्र,या युक्तीवादानंतर सात न्यायाधीशांच्या खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती नसिर-उल-मुल्क यांनी गिलानी यांना 13 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0