शक्तिशाली भूकंपाने न्यूझीलंड हादरले
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहराला शुक्रवारी 5.8 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या
वेलिंग्टन- अतिशय शक्तिशाली भूकंपाच्या हाद-यांच्या मालिकेने शुक्रवारी न्यूझीलंडमधील ख्रास्टचर्च हादरले. या हाद-यांमुळे इमारती हलल्या व अनेक दुकानातील शेल्फवर ठेवलेले सामान खाली कोसळले. त्यामुळे नाताळच्या सणासाठी खरेदीला आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी रस्त्यांवर धाव घेतली. हा भूकंपानंतर सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आला नसून शहरातही मोठी हानी झाली नसल्याचे निदर्शनास आले.
एका मॉलमध्ये एक व्यक्ती जखमी झाल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एक खडक कोसळल्यानंतर त्याखाली अडकलेल्या चार जणांची सुटका करण्यात आली. याव्यतिरिक्त शहरात इतर कोणतीही जीवित किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याची माहिती ख्राइस्टचर्चच्या पोलिसांनी दिली.
भूकंपाच्या या हाद-यांपैकी पहिला 5.8 रिश्टर क्षमतेचा हादरा दुपारी बसला व त्यानंतर काही मिनीटांनी 5.3 रिश्टरचा दुसरा हादरा बसला. पुन्हा काही वेळाने बसलेला 5.8 रिश्टरचा तिसरा हादरा जास्त शक्तिशाली होता व त्याचा परिणाम जास्त जाणवला. पहिल्या हाद-यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळ रिकामे करण्यात आले व सर्व मॉल्स बंद करण्यात आले. त्याच प्रकारे सर्व इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या, अशी माहिती भूकंप आपत्ती निवारण अधिका-यांनी दिली. काही भागात खडक कोसळण्याच्या घटना घडल्या तर ज्या भागात भुसभुशीत जमीन होती त्या भागात भूजल वर आले, असे वृत्त न्यूझीलंडच्या सरकारी रेडियोने दिले आहे.Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा