पहिले पान | विदेश | बेनजीर भुत्तो यांच्या हत्येचा तपास पूर्ण

बेनजीर भुत्तो यांच्या हत्येचा तपास पूर्ण

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांच्या हत्येचा तपास जवळजवळ पूर्ण झाला असून तो सार्वजनिक करावा की, नाही ते सत्तारुढ पाकिस्तानी पीपल्स पार्टी ठरवले, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पत्रकारांना सांगितले.

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांच्या हत्येचा तपास जवळजवळ पूर्ण झाला असून तो सार्वजनिक करावा की, नाही ते सत्तारुढ पाकिस्तानी पीपल्स पार्टी ठरवले, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पत्रकारांना सांगितले.

 

भुत्तो यांची हत्या हा राष्ट्रीय मुद्दा नाही तर आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेला मुद्दा आहे. या हत्याप्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली असून हा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे, असे गिलानी म्हणाले. भुत्तो यांच्या थडग्याला आदरांजली वाहल्यानंतर त्यांनी तपासाबाबतची माहिती पत्रकारांना दिली. मात्र, तपास अहवाल सार्वजनिक करायचा की नाही ते पक्षाची कार्यकारिणी समिती ठरवेल, असेही गिलानी यांनी स्पष्ट केले. जर तपास सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्याची माहिती गृहमंत्री लोकांना सांगतील, अशी माहिती गिलानी यांनी पत्रकारांना दिली.

 भुत्तो यांच्या हत्याला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्यात सरकारला अपयश आले आहे, या प्रश्नाला बगल देत तपासावर परिणाम होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0