पहिले पान | विदेश | ‘थाने’ वादळाच्या बळींची संख्या 47

‘थाने’ वादळाच्या बळींची संख्या 47

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

थाने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कुड्डालोर आणि पुदुचेरीतील जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले असले तरी बळींची संख्या वाढतच असून ती 47 झाली आहे.

कुड्डालोर- थाने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कुड्डालोर आणि पुदुचेरीतील जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेतले आहे. वीजपुरवठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर वादळामुळे कोसळून पडलेली झाडे आणि ढिगारेही उचलण्यात आले आहेत. या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. कुड्डालोर जिल्हय़ात दुर्गम भागात आणखी पाच जणांचा वादळामुळे बळी गेल्यामुळे बळींची एकूण संख्या आता 47 वर पोहोचली आहे. थानेमुळे तामिळनाडूत 40 तर पुदुचेरीत सात जण बळी गेले आहेत. दरम्यान, खराब हवामान कायम असल्यामुळे मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्याचा नियोजित दौरा रद्द केला आहे.

थाने चक्रीवादळाचा फटका तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्हय़ाला सर्वाधिक बसला असून 18 हजार लोकांनी शासकीय इमारती, शाळा आणि लग्नांच्या सभागृहात आश्रय घेतला आहे.पुदुचेरीतही अशीच परिस्थिती आहे. आश्रय घेतलेल्या सर्वाना भोजन तसेच इतर अनेक जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0