पहिले पान | विदेश | पायरसीविरोधी कायद्याला फेसबुकचाही विरोध

पायरसीविरोधी कायद्याला फेसबुकचाही विरोध

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

अमेरिकन सिनेटमध्ये येऊ घातलेल्या पायरसीविरोधी कायद्याला फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यानेही विरोध केला आहे.

न्यूयॉर्क- अमेरिकन सिनेटमध्ये येऊ घातलेल्या पायरसीविरोधी कायद्याला फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यानेही विरोध केला आहे. पायरसीविरोधात 'विकिपीडिया'ने बुधवारी काळा दिवस पाळत इंग्रजी संकेतस्थळ बंद ठेवून निषेध नोंदवला होता. 

अमेरिकेमध्ये सध्या स्टॉप ऑनलाईन पायरसी अँक्ट (सोपा) आणि प्रोटेक्ट आयपी अँक्ट (पिपा) ही दोन विधेयके येऊ घातली आहेत.कायद्याबाहेरील साईट्सना आळा घालण्यासाठी  हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. या कायद्यान्वये संपूर्ण वेबसाईटच ब्लॉक करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे. त्यामुळे सोशल नेटवर्कींग साईट्सनी याला तीव्र विरोध केला असून त्यामध्ये झुकेरबर्गनेही उडी घेतली आहे. 

"सोपा आणि पीपा हे कायदे अस्तित्त्वात आल्यास पायरसी कमी होण्यापेक्षा इंटरनेटच्या मूळ संकल्पनेलाच धोका पोहचेल, असे झुकेरबर्ग याने फेसबुकवरील त्याच्या 'वॉल'वर लिहिले आहे. झुकेरबर्गच्या या पोस्टवर तासाभरातच लाखो लोकांनी लाईक केले.

फेसबूकसह विकिपिडिया, गुगल यासारख्या अनेक सोशल नेटवर्कींग साईट्सनी या विधेयकाला विरोध केला आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0