गिलानींवरील सुनावणी एक फेब्रुवारीला
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधातील न्यायालयाच्या अवमान प्रकरणावरील सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधातील न्यायालयाच्या अवमान प्रकरणावरील सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
"मला न्यायालयाचा आदर असून मी कधीही न्यायालयाचा अवमान करण्याबाबत विचारही करू शकत नाही" असे गिलानी यांनी न्यायालयात हजर राहण्यापूर्वी सांगितले.
मात्र नेत्यांविरोधातील बंद केलेले खटले सरकार पुन्हा चालवू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.
गुरुवारी पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती नसीर-उल-मुल्क यांच्यासमोर अवमानाबाबत गिलानींनी कबुली दिल्यानंतर न्यायमूर्तींनी हा खटला एक फेब्रुवारीपर्यंत तहकूब केला.
गिलानी यांना न्यायालयाच्या अपमान प्रकरणात नोटीस मिळाल्यानंतर झुकणार नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
गिलानी यांच्याकडून वकील एतजाझ एहसान यांनी बाजू मांडली. न्यायालयाचा अवमान करण्याचा गिलानी यांचा कोणताही उद्देश नव्हता. त्यांना न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून ते न्यायपालिकेचा सन्मान करतात असा युक्तीवाद एहसान यांनी केला.
न्यायालयात हजर राहण्याचा गिलानी यांच्या निर्णयाचे न्यायपालिकेने कौतुकही केले. न्यायमूर्ती असिफ खोजा यांनी गिलानी यांच्या उपस्थितीवरुन त्यांना न्यायपालिकेचा आदर असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा