आलिशान 'क्रूज'ला जलसमाधी
इटलीच्या पश्चिम किना-यावर एका अलिशान क्रूज प्रवासी जहाजाला शुक्रवारी अपघात होऊन, तीन प्रवासी बुडाले असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
रोम- इटलीच्या पश्चिम किना-यावर एका अलिशान क्रूज प्रवासी जहाजाला शुक्रवारी अपघात होऊन, तीन प्रवासी बुडाले असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली. या जहाजामध्ये 60 हून अधिक देशांचे चार हजार 234 प्रवासी होते. 4000 प्रवाशांना वाचवले असून अद्यापही 70 जण बेपत्ता आहेत.
स्थानिक वेळेनुसार शु्क्रवारी रात्री आठ वाजता 200 मीटर लांबीच्या या जहाजाला आइसलँड बेटाजवळील जिग्लिओ या बेटानजिक प्रवासी जहाजाला अपघात झाला. अपघातानंतर हे जहाज एका बाजूला 20 डिग्रीत कलले आणि पाण्यात बुडू लागले. त्यामुळे अनेक प्रवाशांनी घाबरून पाण्यात उड्या मारल्या आहेत. यावेळी चेंगराचेंगरी होऊन अनेकजण जखमी झाले आहेत.
जहाजामध्ये इटलीचे एक हजार, जर्मनीचे 500 आणि फ्रान्सचे 150 प्रवासी आहेत, असे जहाज कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले.
प्रवाशांना वाचवण्यासाठी दीड हजार होड्या रवाना झाल्या आहेत. प्रवाशांची आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत आहोत, अशी माहिती आइसलँडचे महापौर सर्जी ओरटेल्ली यांनी दिली.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा