स्टीव्ह जॉब्ज यांना मरणोत्तर ग्रॅमी पुरस्कार
संगणक तसेच मोबाईल क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून संगीताची जादू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल स्टीव्ह जॉब्ज यांना मरणोत्तर ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला
लॉस एन्जेलिस-संगणक तसेच मोबाईल क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून संगीताची जादू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल स्टीव्ह जॉब्ज यांना मरणोत्तर ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला. ग्रॅमी सोहळ्यात १२ फेब्रुवारीला हा पुरस्कार देण्यात येईल. जॉब्ज यांच्यासह ध्वनिमुद्रण अभियंता रुडी व्हॅन जेल्डर आणि संगीतकार डेव्ह बाथरेलोमिओ यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. ध्वनिमुद्रण क्षेत्रात बहुमोल योगदान दिल्याबद्दल यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
सर्जननात्मक द्रष्टा असलेल्या स्टीव्ह यांच्या आयपॉड सारख्या जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मालिकेने तसेच ऑनलाईन आय-टय़ूनमुळे संगीत क्षेत्राला कमालीचा फायदा झाला. संगीत सर्वच स्तरातल्या लोकांच्या अंगाखांद्यावर खेळू लागले. त्याचे सर्व श्रेय स्टीव्ह जॉब्ज यांनाच जाते, अशी माहिती ग्रॅमीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
या आधीही 2002 साली अॅपल कंपनीला ध्वनिमुद्रण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल तांत्रिक ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. जॉब्ज यांचे ऑक्टोबरमध्ये कर्करोगाने निधन झाले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा