बगदादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 31 ठार
बगदादमध्ये एका रुग्णालयाबाहेर शुक्रवारी झालेल्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 31 जण ठार झाले. या स्फोटात 60 जण जखमी झाले आहेत.
बगदाद- बगदादमध्ये एका रुग्णालयाबाहेर शुक्रवारी झालेल्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 31 जण ठार झाले. या स्फोटात 60 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकारामुळे बगदादमध्ये खळबळ उडाली आहे.
शिया पंथीयांना लक्ष करण्याचा इशारा अल कईदा या अतिरेकी संघटनेने दिला होता. अमेरिकेच्या लष्कराने माघार घेतल्यानंतर महिनाभरातच हा बॉम्बस्फोट झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाफरानिया येथे एका अंत्यसंस्कारासाठी लोक एकत्र आले असता सकाळी 11 च्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला.
हल्ल्यांमध्ये मारले गेलेले बहुतांश शिया पंथीय आणि इराकी सुरक्षा दलाचे सदस्य आहेत.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा