स्यू ची यांची राजकीय वाटचाल सुरू
म्यानमारमधील लोकशाहीच्या प्रणेत्या आंग सान स्यू ची यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच म्यानमारच्या राष्ट्रीय संसदेत प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाची नोंदणी केली.
नेपीताव- म्यानमारमधील लोकशाहीच्या प्रणेत्या आंग सान स्यू ची यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच म्यानमारच्या राष्ट्रीय संसदेत प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाची नोंदणी केली. अशा प्रकारे त्या म्यानमारच्या प्रमुख राजकीय प्रवाहात शिरकाव करण्यास सज्ज झाल्या आहेत.
म्यानमारच्या राजधानीला भेट दिल्यावर त्यांनी कनिष्ठ सभागृहाचे सभापती श्वे मान यांच्याशी चर्चा केली. स्यू ची यांची भेट झाल्यावर मान यांनी समाधान व्यक्त केले. एकीमध्येच बळ असल्याने आम्हाला एकत्र राहून काम करावे लागेल, असे मान यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
त्यापूर्वी स्यू ची यांनी म्यानमारच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) या पक्षाची नोंदणी केली. अधिकृतपणे ही प्रक्रिया होण्यासाठी त्यांना किमान एक आठवडा वाट पाहावी लागेल.
‘एनएलडी’ ला या महिन्यातच निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे या नोबेल पुरस्कार विजेतीचा नव्या संसदेत प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे. वरिष्ठ सभागृहाचे नेते खिन आँग म्यींट यांनी देखील स्यू ची यांची भेट घेऊन त्यांचे संसदेतील आगमन म्हणजे एक शुभ घटना असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी एनएलडीने म्यानमारमधील निवडणुकांसाठी असलेले नियम अन्यायकारक असल्याचे सांगत निवडणुकांवर बहिष्कार घातल्यावर, एनएलडीची मान्यता रद्द झाली होती. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर स्यू ची यांची मुक्तता करण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा विचार असून, अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा