इंग्लंडमध्ये पुण्यातील विद्यार्थ्याची हत्या
इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पुण्यातील विद्यार्थ्याची सोमवारी इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.
लंडन- हल्लेखोरांनी वेळ विचारली असता ती सांगण्यास अनुज बिडवेने नकार दिल्यावर त्याची हत्या करण्यात आली, असा दावा लंडन पोलिसांनी केला आहे. ही हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणी मँचेस्टर पोलिसांनी चार जणांना अटक केली.
पुण्यात राहणार अनुज लँकेस्टर विद्यापीठात मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी तो आणि त्याचे मित्र मँचेस्टर शहरातील सॉल्फर्ड भागात गेले होते. घरी परतत असताना दोन तरुणांनी त्याला वेळ विचारली. ती सांगण्यास नकार दिल्याने त्यापैकी एकाने बंदूक काढली आणि अनुजच्या डोक्यावर गोळी झाडली.
या हल्ल्यानंतर घाबरलेले त्याचे मित्र त्याला सोडून पळून गेले. मात्र या भागात राहणारी शीतर पटेल ही केक उत्पादक तरुणी त्यांच्या मदतीला धावून आली. ‘अनुजला वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मी पुरेपूर मदत केली. त्याचा श्वासोश्वास सुरू होता. त्यामुळे त्याला डॉक्टरकडे घेऊन मी निघाले. मात्र उपचारांअभावी तो जास्त वेळ जिवंत राहू शकला नाही,’ असे शीतलने सांगितले.
मँचेस्टर पोलिसांनी दोल अल्पवयीन मुलांसह चौघांना या प्रकरणी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.अनुज हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. आपल्या हुशारीच्या जोरावर त्याने अल्पावधीतच खूप प्रगती केली होती. त्याच्या हत्येमुळे आम्हांला मोठा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया लॅकेस्टर विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. बॉब मॅक्न्ले यांनी व्यक्त केली.
अनुजला फेसबुकवरुन श्रद्धांजली
दरम्यान, अनुजची हत्या झाल्याची बातमी कळताच फेसबुकवरुन त्याला श्रद्धांजली वाहणारे अनेक स्क्रॅप दिवसभर टाकण्यात आले. अनुज मित्रांनी तसेच नेटिझन्सनी या हत्येचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला. अनुजच्या हत्येच्या निषेधार्थ सॅलफोर्ड येथे दोन जानेवारीला सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी दिल्लीत इंडिया गेट ते जंतरमंतर यादरम्यान मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा