पहिले पान | विदेश | पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चेसाठी इझ्रायल उत्सुक

पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चेसाठी इझ्रायल उत्सुक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पॅलेस्टाइनचे मन वळवण्याची विनंती इझ्रायलने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना केली आहे.

संयुक्त राष्ट्रे- शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पॅलेस्टाइनचे मन वळवण्याची विनंती इझ्रायलने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना केली आहे. पॅलेस्टाइनसोबत थेट चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी इझ्रायल उत्सुक असल्याचे इझ्रायलचे उपपंतप्रधान शालोम यांनी बान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले.

पॅलेस्टाइनला थेट चर्चेसाठी येण्याचे आवाहन अमेरिका, रशिया, युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्रांच्या क्वार्टेटने करावे, अशी विनंती इझ्रायलने केली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर सध्या क्वार्टेटचे विशेष प्रतिनिधी आहेत. क्वार्टेटची बैठक येत्या 19 मार्च रोजी मॉस्को येथे होणार आहे.   

क्वार्टेटच्या बैठकीनंतर इझ्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये थेट चर्चा पुन्हा सुरू होऊ शकेल, अशी आशा बान यांनीही व्यक्त केली आहे.

डिसेंबर 2008 मध्ये इझ्रायलने गाझा पट्ट्यात केलेल्या लष्करी कारवाईनंतर इझ्रायल आणि पॅलस्टाइनमधील शांतता चर्चा खंडित झाली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने चर्चा करण्यास पॅलेस्टाइनने तयारी दर्शवली आहे. मात्र पॅलेस्टाइनला थेट चर्चेसाठी तयार करण्याचे आवाहन इझ्रायलने संयुक्त राष्ट्राला केले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0