पाकिस्तानात अमेरिकेचा ड्रोन हल्ला;चार ठार
पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार संशयित दहशतवादी ठार झाले.
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमधील मिरनशाह भागात अमेरिकेच्या सैन्याने ड्रोन विमानातून सोडलेल्या दोन क्षेपणास्त्रांमुळे चार संशयित दहशतवादी ठार झाले.
नोव्हेंबर महिन्यात नाटोच्या सैन्याने पाक-अफगणिस्तान सीमेवरील पाकिस्तानच्या चौकीवर हल्ला करीत 24 पाकिस्तानी जवानांना ठार मारले होते. त्यामुळे या भागात पाकिस्तानने अमेरिकेच्या विमानांना बंदी घातली होती. या हल्ल्यानंतर बुधवारी पहाटे पुन्हा एकदा अमेरिकेने ड्रोन विमानांतून हल्ले केले.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा