अमेरिकन लष्करात आता मानवरहित कार्गो ड्रोन
दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी, वैमानिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी मानवरहित ड्रोन असतानाच आता अत्यंत जोखीम असलेल्या, सुरुंग किंवा बॉम्ब पेरलेल्या ठिकाणांवर मदत सामग्री पोहोचवण्यासाठी आणि मनुष्यहानी टाळण्यासाठी मानवरहित कार्गो ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
लंडन- दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी, वैमानिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी मानवरहित ड्रोन असतानाच आता अत्यंत जोखीम असलेल्या, सुरुंग किंवा बॉम्ब पेरलेल्या ठिकाणांवर मदत सामग्री पोहोचवण्यासाठी आणि मनुष्यहानी टाळण्यासाठी मानवरहित कार्गो ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. अमेरिकेने ‘के-मॅक्स’ या नावाची दोन कार्गो ड्रोन तयार केली आहेत. या कार्गो ड्रोनचा वापर अफगाणिस्तानमध्ये सध्या सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे.
अफगाणिस्तानमधील हेलमंड प्रांतातल्या गर्मसिर जिल्हय़ात अमेरिकी सैन्य दलाच्या तळावरून इतर भागात रसद पोहोचवण्यासाठी या कार्गो ड्रोनचा वापर केला जात आहे.
ही कार्गो ड्रोन 17 डिसेंबर 2011 पासून मदत सामग्रीसाठी कार्यरत झाली असून आतापर्यंत 20 मोहिमांमध्ये त्यांनी आपले काम चोखपणे केले आहे. या मोहिमेद्वारे सैनिकांना हजारो टन अन्न आणि पुढील मोहिमांसाठी आवश्यक असणारे सुटे भाग पुरवण्यात आले आहेत. या ड्रोनमध्ये संगणकाद्वारे मोहिमेचा आराखडा भरला जातो. त्यानुसार कार्गो ड्रोन मानवरहित असतानाही स्वत:चे काम चोखपणे बजावतात.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा