गुगल चीनमधून गाशा गुंडाळणार?
सर्च इंजिनमार्फत प्रसारित होणा-या माहितीमध्ये ढवळाढवळ होत असल्याचे कारण देऊन चीनमधून गाशा गुंडाळण्याची तयारी गुगल या अग्रगण्य सर्च इंजिनने केली आहे.
वॉशिंग्टन- सर्च इंजिनमार्फत प्रसारित होणा-या माहितीमध्ये ढवळाढवळ होत असल्याचे कारण देऊन चीनमधून गाशा गुंडाळण्याची तयारी गुगल या अग्रगण्य सर्च इंजिनने केली आहे. चीनमध्ये मानवी हक्कांसाठी काम करणा-या अनेक कार्यकर्त्यांची जीमेल अकाऊंट्स त्रयस्थांकडून उघडली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे गुगलचे उपाध्यक्ष निकोल वोंग यांनी अमेरिकी संसदेच्या सदस्यांना सांगितले.
गुगलमार्फत प्रसारित होणा-या माहितीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध कंपनी सहन करणार नाही, असा पवित्रा गुगलने घेतला आहे. जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ चीनमध्ये असली तरीही या देशातील व्यवसायाबाबत गुगलने फेरविचार सुरू केल्याचे ते म्हणाले.
डिसेंबर महिन्यात गुगलच्या चीनमधील इन्फ्रास्ट्रक्चरवर अत्याधुनिक साधनांचा वापर करून हल्ले झाल्याचे कंपनीने नमूद केले. या हल्ल्यांचा हेतू जीमेल अकाऊंट्स उघडणे हाच होता, असेही वोंग म्हणाले.
इंटरनेटमार्फत प्रसृत होणा-या माहितीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादले जाऊ नयेत, यासाठी परराष्ट्र धोरणात तरतूद करण्याची मागणी गुगलने अमेरिकी संसद सदस्यांच्या समितीपुढे केली आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा