पहिले पान | विदेश | म्यानमारमध्ये लोकशाहीची पायमल्ली- अमेरिका

म्यानमारमध्ये लोकशाहीची पायमल्ली- अमेरिका

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

म्यानमारमधील लष्करी राजवटीने जाहीर केलेला राजकीय पक्ष नोंदणी कायदा म्हणजे लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली असल्याची टीका अमेरिकेने केली आहे.

वॉशिंग्टन- म्यानमारमधील लष्करी राजवटीने जाहीर केलेला राजकीय पक्ष नोंदणी कायदा म्हणजे लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली असल्याची टीका अमेरिकेने केली आहे. लष्करी राजवटीने आणलेल्या या नव्या कायद्यानुसार राजकीय कैद्यांनाही निवडणूक लढवता येणार नाही. म्यानमारमधील विरोधी पक्षनेत्या आंग सान स्यू ती यांनाही या कायद्यामुळे निवडणूक लढवता येणार नाही. 

या कायद्यामुळे स्यू की यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यांना पक्षातूनही बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. हा कायदा एकंदर लोकशाही प्रक्रियेला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल, अशी टीका सहाय्यक सचिव पी जे क्रॉली यांनी केली.

या कायद्यामुळे म्यानमारमधील दोन हजार राजकीय कैद्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभाग नाकारला जात आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने मारक आहे, असे क्रॉली म्हणाले. याबाबत ओबामा प्रशासन म्यानमारमधील लष्करी राजवटीशी चर्चा करेल, असे त्यांनी सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0