PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: म्यानमारमध्ये लोकशाहीची पायमल्ली- अमेरिका म्यानमारमध्ये लोकशाहीची पायमल्ली- अमेरिका ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 03:35:00 PM वॉशिंग्टन- म्यानमारमधील लष्करी राजवटीने जाहीर केलेला राजकीय पक्ष नोंदणी कायदा म्हणजे लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली असल्याची टीका अमेरिकेने केली आहे. लष्करी राजवटीने आणलेल्या या नव्या कायद्यानुसार राजकीय कैद्यांनाही निवडणूक लढवता येणार नाही. म्यानमारमधील विरोधी पक्षनेत्या आंग सान स्यू ती यांनाही या कायद्यामुळे निवडणूक लढवता येणार नाही. या कायद्यामुळे स्यू की यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यांना पक्षातूनही बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. हा कायदा एकंदर लोकशाही प्रक्रियेला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल, अशी टीका सहाय्यक सचिव पी जे क्रॉली यांनी केली. या कायद्यामुळे म्यानमारमधील दोन हजार राजकीय कैद्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभाग नाकारला जात आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने मारक आहे, असे क्रॉली म्हणाले. याबाबत ओबामा प्रशासन म्यानमारमधील लष्करी राजवटीशी चर्चा करेल, असे त्यांनी सांगितले.