पहिले पान | विदेश | पंतप्रधानांना प्रतिष्ठेचा वर्ल्ड स्टेट्समन पुरस्कार

पंतप्रधानांना प्रतिष्ठेचा वर्ल्ड स्टेट्समन पुरस्कार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

दी अपील ऑफ कॉन्शस फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा वर्ल्ड स्टेट्समन पुरस्कार 2010 सालासाठी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे.

वॉशिंग्टन- दी अपील ऑफ कॉन्शस फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा वर्ल्ड स्टेट्समन पुरस्कार 2010 सालासाठी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास होकार दिला असून येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. अमेरिकेचे माजी उपसचिव जॉन नेग्रोपोंट यांनी गुरुवारी भारताच्या अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली.   

हा पुरस्कार यापूर्वी अनेक दिग्गजांना मिळालेला आहे. 2009 साली ब्रिटिश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांना, तर 2008 साली फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना मिळाला होता. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल (2007), ब्राझिलचे अध्यक्ष लुइझ आयनॅसिओ लुला दा सिल्वा (2006) यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रब्बी अर्थर शायनर यांनी 1965 मध्ये स्थापन केलेली दी अपील ऑफ कॉन्शस फाऊंडेशन ही संस्था जगभरात धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी काम करते. शांतता, सहिष्णुता आणि वांशिक संघर्षांवर तोडगा काढणे ही या संस्थेपुढील प्रमुख उद्दिष्टे आहेत.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0