पहिले पान | विदेश | याहूचे सहसंस्थापक यांग यांचा राजीनामा

याहूचे सहसंस्थापक यांग यांचा राजीनामा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

याहू कंपनीचे सह-संस्थापक जेरी यांग यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला.

न्यूयॉर्क- याहू कंपनीचे सह-संस्थापक जेरी यांग यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला.

यांग यांनी संचालक पदासोबत याहू कंपनीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचे याहूने म्हटले आहे. यामध्ये याहू जपान कार्पोरेशन आणि अलिबाबा ग्रुप लिमिटेड या कंपन्यांतूनही यांग यांना भारमुक्त केले आहे. यांग याहूचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

याहुच्या कार्यकारी प्रमुखपदी स्कॉट थॉम्पसन यांची नियुक्ती झाल्यापासून दुस-या आठवड्यातच यांग यांनी राजीनामा दिला आहे.

"सुमारे 17 वर्षांपूर्वीपासून मी कंपनीचा सहसंस्थापक आहे.कंपनीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या आयुष्यात मला खूप चांगला आणि रोमहर्षक अनुभव आला. सध्या याहू कंपनी सोडून दुस-या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठीची वेळ आली आहे" असे यांग यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

1995 मध्ये यांग आणि त्यांचे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील वर्गमित्र डेव्हिड फिलो या दोघांनी मिळून याहूची  स्थापना केली होती.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0