PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: स्यू की यांना निवडणूक लढवण्यास बंदी स्यू की यांना निवडणूक लढवण्यास बंदी ================================================================================ पीटीआय on 10 March, 2010 04:55:00 PM यांगून- म्यानमारमधील लष्करी सरकारने नवीन निवडणूक नियमांनुसार विरोधी पक्षनेत्या तसेच मानवी हक्क कार्यकर्त्या आंग सान स्यू की यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. सरकारच्या प्रवक्त्याने बुधवारी ही माहिती दिली. राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठीच्या नवीन नियमांनुसार, कारावास भोगणारी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. मानवी हक्कांसाठी लढणा-या कार्यकर्त्यांनी या नियमावर टीका केली आहे. स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाला 1990 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र लष्करी सरकारने त्यांना सत्तेवर येऊ दिले नाही. नवीन निवडणूक नियमांचे पालन केले नाही, तर या पक्षाची मान्यता रद्द होईल, असा इशारा लष्करी सरकारने दिला आहे. त्यामुळे स्यू की यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, पक्षाचे प्रवक्ते यान विन यांनी स्पष्ट केले.