'लष्कर आणि न्यायालयासोबत संघर्ष नको'
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालय आणि लष्कराबरोबर कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको असल्याचे मत पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
इस्लामाबाद- पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालय आणि लष्कराबरोबर कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको असल्याचे मत पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दुबई दौरा आटोपून झरदारी आज सकाळी पाच वाजता इस्लामाबादला परतले. दुबई दौरा वैयक्तिक कारणांसाठी आणि पूर्वनियोजितच होता असेही झरदारी यांनी सांगितले.
मेमोगेट प्रकरणावरून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे संबंध ताणले गेले असताना झरदारी गुरुवारी अचानक दुबईला गेल्याने देशातउलटसुलट चर्चांना उधाण आले होते. दुबई दौरा हा व्यक्तिगत कारणांसाठी आणि तो पूर्वनियोजितच असल्याचे दुबईहून परतल्यानंतर त्यांनी सांगितले. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालय आणि लष्करासोबत कोणत्या प्रकारचा संघर्ष करायचा नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लवकरच कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर नॅशनल असेंबलीचे शुक्रवारी आज विशेष सत्र बोलवण्यात आले आहे. त्यापूर्वी झरदारी पाकिस्तानात परतल्याने विशेष सत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सत्रापूर्वी लष्करासोबत समंजस्य करार झाला असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र झरदारी आणि पंतप्रधान युसूफ राजा गिलानी यांना फटकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेष सत्रापूर्वी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या संसदीय समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. विशेष सत्रात शक्तिपरीक्षण घेण्यावर या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा