पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क | जेफ्री आर्चर स्मूथ ऑपरेटर

जेफ्री आर्चर स्मूथ ऑपरेटर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जेफ्री आर्चरला फक्त बेस्टसेलर लेखकाच्या पिंज-यात अडकवणं म्हणजे त्याच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाची आणि ‘कर्तृत्वा’ची केवळ एकच बाजू उजेडात आणण्यासारखं आहे. अंगी मस्त नाना कळा असलेला हा माणूस आहे, ज्याला आपण ‘मॅन ऑफ मेनी फेसेस’, स्मूथ ऑपरेटर म्हणू शकू असा..

जेफ्री आर्चरला फक्त बेस्टसेलर लेखकाच्या पिंज-यात अडकवणं म्हणजे त्याच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्वाची केवळ एकच बाजू उजेडात आणण्यासारखं आहे. अंगी मस्त नाना कळा असलेला हा माणूस आहे, ज्याला आपण मॅन ऑफ मेनी फेसेस’, स्मूथ ऑपरेटर म्हणू शकू असा..

 

जेफ्रीच्या नावावर आज जवळपास ८५ पुस्तकं जमा आहेत. केन अँड एबल’, ‘नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस’, ‘इलेवन्थ कमांडमेन्ट’, ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’, ‘पाथ्स ऑफ ग्लोरीयासारख्या भन्नाट कादंब-या, ‘अ ट्विस्ट इन द टेलसारखे कथासंग्रह, ‘द अ‍ॅक्युज्डसारखी नाटकं, बालकथा, स्वानुभवाचे बोल असं बरंच कोही लिहिणा-या लेखकराव जेफ्रीचे इतरही अनेक चेहरे आहेत. स्वार्थासाठी खोटं बोलणारा, बनवाबनवी करणारा, न्यायालयात शपथेवर खोटं बोलणारा, पैशांची अफरातफर करणारा, शेअर मार्केटमधील इनसाइड ट्रेडिंग, कॅनडातील मोठ्ठय़ा डिपार्टमेंटल स्टोअरमधून चार सूट चोरून मी तो नव्हेच, असा आव आणणारा हाही जेफ्रीच. अगदी ऑक्सफर्डमध्ये शिकतानाही कोही प्रमाणपत्रांच्या बाबतीत त्याने दिशाभूल केल्याचा आरोप आहे. यातील अनेक आरोप सिद्ध झाले, कोही त्यानेच कोलांतराने मान्य केले तर काही आरोपांमुळे त्याच्या एकूण वर्तनाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

 

त्याचा आणखी एक चेहरा आहे तो म्हणजे लॉर्ड जेफ्री आर्चर. त्याने केलेल्या मानवतावादी कोर्याबद्दल, कुर्दीश निराधारांसाठी आणि इतर धर्मादाय संस्थांसाठी निधी उभारण्यासाठी त्याने घेतलेल्या पुढाकाराबद्दल राणीने त्याला उमरावकी बहाल केली होती. पण यापैकीही कोही संस्थांच्या निधीत त्याने अफरातफर केल्याचे आरोप होऊन चौकशीची मागणी झाली होती. एकेकाळी हुजूर पक्षाचा खासदार म्हणून निवडून आलेल्या जेफ्रीला याच आरोपांमुळे नंतर खासदारकीच्या निवडणुकीत उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली, पक्षाचं उपाध्यक्षपद सोडावं लागलं आणि कालांतराने राजकीय कारकीर्दीवरच पाणी सोडावं लागलं. न्यायालयाशी बनवाबनवी केल्याबद्दल तो दोन र्वष तुरुंगातही जाऊन आला आहे.

 

याच कोळात त्याने इतरही रंगढंग केले होतेच. पण इतकं सगळं होऊनही त्याच्यातील लेखक मात्र जागा होता. याच तुरुंगवासाच्या कोळात केलेल्या नोंदींवरून त्याने प्रिझन डायरीज्ही अनुभवसिद्ध रोजनिशी लिहिली. विशेष म्हणजे, त्याच्या कादंब-या व इतर लिखाणाला भरताड, अशक्यप्राय, कोय वाट्टेल ते लिहितो बेटा, वाचवतं तरी कसं कसं हे लोकांना..असं निकालात कोढणा-या समीक्षकांनी त्याचे हे अनुभवाचे बोल मात्र वाखाणले.

 

त्याचं पहिलं पुस्तक होतं नॉट अ पेनी मोअर..’. त्याचीही एक कथा आहे. १९७४मध्ये तो खासदार होता तेव्हाच एका कॅनडियन कंपनीतील गुंतवणूक बुडाल्यामुळे त्याच्यावर दिवाळखोरी जाहीर करायची वेळ आली आणि खासदारकीचाही राजीनामा द्यावा लागला. आता काय करायचं, या विचारात असताना त्याने लेखणी सरसावली आणि नॉट अ पेनी मोअर..कोगदावर उतरू लागली. आत्मक्लेष क रून घेत नैराश्याच्या गर्तेत डुबून जाणं मला मान्य नव्हतं, म्हणून मी लिखाणाकडे वळलो आणि मला माझ्यातील स्टोरीटेलर सापडला. या पहिल्याच कोदंबरीने मला पुन्हा आर्थिक स्थैर्य दिलं आणि लेखक म्हणूनही नवा चेहरा दिला. माझं हे लिखाण १४ प्रकाशकांनी नाकारलं होतं, तरीही मी धीर सोडला नाही. नेव्हर गिव्ह अपयावर माझा ठाम विश्वास आहे आणि नव्या उमेदीच्या लेखकांनाही मी हेच सांगेन..असं जेफ्री आजही सांगतो. त्यानंतर आलेल्या केन अँड एबलने त्याचं नाव जगभर पोहोचवलं.

 

२००३ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यावर लेखक म्हणून नवीन इनिंग सुरू करताना त्याने हेच धोरण प्रत्यक्षात आणलं. प्रिझन डायरीज्, फोल्स इम्प्रेशन ही त्याची या दुस-या अध्यायातील प्रारंभीची पुस्तकं. तो खूप पाल्हाळीक, शब्दबंबाळ लिहितो, त्याची बेस्टसेलर ठरलेली पुस्तकं ही खरी तर या लिखाणातून पुस्तक आकाराला आणणा-या संपादकांची कमाल आहे, असंही बोललं जातं. त्याच्यासाठी दुसरं कुणी तरी लिहितं, असंही काही जण म्हणतात. जेफ्री त्याच्यावरचे आरोप, खटले, तुरुंगवास, टीका या कशाबद्दलही एक चकार शब्द कोढत नाही. माझी पुस्तकं वाचकांना आवडतात ना बस तर मग, अशी त्याची भूमिका. मुंबईत वा अन्य कुठल्याही ठिकाणी पदपथांवर मांडलेल्या पुस्तकांमध्ये त्याचं पुस्तक हमखास दिसतंच, हीच त्याच्या वाचकप्रियतेची पावती आहे. तो दोन वेळा भारतात येऊन गेलाय. मुंबई, पुण्यात त्याच्या सहीसाठी रांगा लावून पुस्तक खरेदी करणारे भारतीय वाचक आहेत, याचं त्याला कोण कौतुक. पुण्यात तर एका सिग्नलवर एका पुस्तकविक्रेत्या मुलानं माझंच पुस्तक माझ्यासमोर केलं होतं, अशी आठवणही तो अपूर्वाईने सांगतो. भारतात तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांत प्रसिद्ध झालेला हा बहुधा एकमेव विदेशी लेखक (जेम्स हॅडली चेसचा अपवाद वगळता) असावा.

 

वाचकांची उत्कंठा प्रत्येक पानाबरोबर वाढली पाहिजे, पुढच्या पानावर कोय, याची उत्सुकता त्याच्या मनात दाटायला हवी. मी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतो. दहा वेळा, सतरा वेळा, पुन्हा पुन्हा लिहून काढतो. मनात आलं आणि लिहायला बसलं असं सोपं नसतं लिहिणं. ती एक कष्टसाध्य कला आहे. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. स्वयंशिस्त लागते. लेखकाला कोय सन्मान, पुरस्कार, समीक्षकांची प्रशंसा वाटय़ाला येते. पण, स्टोरीटेलर वा उत्तम कथाकाराच्या गोष्टी पिढ्यान् पिढ्या लक्षात ठेवल्या जातात, पुढे सांगितल्या जातात. सुदैवाने मी तसा स्टोरीटेलर आहे,’ असं त्याने आपल्या लेखनाबद्दल म्हटलंय.

 

केन अँड एबलही त्याची विश्वविक्रमी कादंबरी. या त्याच्या कोदंबरीनं एकेकाळी लुडलमच्या कोदंबरीला न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर लिस्टमध्ये मागे टाकलं होतं. ८४ वेळा आवृत्ती निघालेल्या या कोदंबरीच्या आजवर सुमारे साडेतीन कोटी प्रती खपल्या आहेत. १९७५मध्ये त्याची पहिली कोदंबरी आली त्याला आता पस्तीस वर्ष उलटून गेली आहेत. एव्हरेस्टवर पहिली स्वारी करणा-या जॉर्ज मॅलरीबद्दल त्याने लिहिलेल्या पाथ्स ऑफ ग्लोरीया कादंबरीचं गेल्या वर्षी चांगलं स्वागत झालं होतं. आता त्याचा नवीन कथासंग्रह येतोय..

 राजकीय मंडळींमध्ये त्याची आजही ऊठबस असते, कोही धर्मादाय संस्थांसाठी तो आजही निधी उभारतो, त्यांच्यासाठी लिलाव पुकारतो पण, ‘राजकारण माझ्यासाठी संपलंय. आता फक्त लेखन, तेच मला उत्तम जमतं,’ अशी त्याने स्वत:च राजकारणाला सोडचिठ्ठी दिलीय. रायटर्स ब्लॉक काय प्रकार असतो, माझं त्या नावाचं स्पेनमध्ये एक घर आहे, असं गमतीत म्हणणा-या जेफ्रीला लेखकाचा चेहरा चांगलाच भावलाय. वाचकांसाठी हे शुभवर्तमान आहे!

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0