पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क | यलोअर दॅन गोल्ड

यलोअर दॅन गोल्ड

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

‘थ्री इडियट्स’च्या श्रेयावरून लेखक चेतन भगत आणि निर्माता-दिग्दर्शकांमध्ये वाद झाला तरी चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षकांनी उचलून धरलं. एरवी साहित्यकृती आणि पडद्यावरील आविष्कार यांचा भन्नाट समन्वय पाहणं म्हणजे सोन्याहून पिवळं, सॉरी यलोअर दॅन गोल्ड. ‘गॉन विथ द विंड’, ‘बेनहर’, ‘गॉडफादर’ अशी ठळक उदाहरणं देता येतील. अशा कलाकृती पाहून, साहित्यकृती वाचून थरारून जाणं हा जबरदस्त अनुभव ठरतो. ओव्हर द इयर्स इंग्रजी भाषेतील अशा बेस्टसेलर्सनी आणि हॉलिवुडच्या कलाकृतींनी जगभरातील वाचक, प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजावीत इतकी कमी उदाहरणं आहेत, मात्र गो-या साहेबाच्या हॉलिवुडमध्ये हा सिलसिला पिढय़ा दर पिढय़ा चालत आलेला आहे. डॉन व्हिटो कॉलियानी थंड चेह-याने आणि पिचक्या आवाजात म्हणतो-आय अ‍ॅम गोना मेक हिम अ‍ॅन ऑफर ही कान्ट रिफ्युझ.तेव्हा मार्लन ब्रँडोच्या अदाकारीवर जगभरातील चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांची कानशिलं जणू तापली होती इतक्या मोठय़ा प्रमाणात ते पडद्यावरील घटनांशी समरस झाले. ब्रँडोच्या तोंडची ती पंचलाइन त्यांनी चित्रपट पाहण्यापूर्वीच (तीन-चार वर्षं आधी) मारियो पुझोच्या कादंबरीत वाचली होती. कादंबरीतील असंख्य घटना उरात जतन करतच ते गॉडफादरपाहायला आले होते, त्यानंतर त्यांना जे पडद्यावर दिसलं ते सगळं भन्नाट होतं. एक ब्रँडो होता, एक अल-पचिनो आणि फ्रान्सिस फोर्ड कपोलाची दिग्दर्शकीय कारागिरी. गॉडफादरमारियो पुझोचा किती आणि फ्रान्सिस फोर्ड कपोलाचा किती यावर आज वाद निर्माण होऊ शकतो.

 

मार्गारेट मिशेलने 1936 साली गॉन विथ द विंडचं कथानक वाचकांपुढे ठेवलं. कथानकाला 1861 मध्ये जॉर्जियात सुरुवात होते. अमेरिकन सिव्हिल वॉरच्या पार्श्वभूमीवर उभी अमेरिकन संस्कृती, संस्कृतीआड दडलेलं जुनंपुराणं नाटय़ पानापानातून अनुभवत तीसच्या दशकातील तरुण वाचकांच्या त्यावर उडय़ा पडल्या. कादंबरीला 1937चं पुलित्झर अ‍ॅवॉर्ड मिळालं. पटकथाकार सिडने हॉवर्डला त्यातील नाटय़मयता भावून त्याने त्याला दृश्यस्वरूप दिलं. मार्गारेट मिशेलचं कथानक फिकं पडावं, अशी पटकथा हॉवर्डने लिहिली. दिग्दर्शक व्हिक्टर फ्लेमिंगने त्याला पडद्यावर आकार दिला. मेट्रो-गोल्डविन मायरने 238 मिनिटांचा हा अनोखा नजारा 15 डिसेंबर 1939 रोजी अ‍ॅटलांटात आणि 17 जानेवारी 1940 रोजी तो जगभरात प्रदर्शित केला. स्कार्लेट ओ हाराआणि रिट बटलरया प्रमुख व्यक्तिरेखा जणू तरुणाईच्या आदर्शस्रेत झाल्या. विवियन ली आणि क्लार्क गेबल एका रात्रीत अमेरिकन प्रेक्षकांच्या नजरेत सुपरस्टार झाले. पारितोषिक प्राप्त कादंबरीने स्वप्नातही पाहिलं नव्हतं इतकं यश पडद्यावरील कलाकृतीने एका दमात मिळवलं. कादंबरीतलं नाटय़ काव्य बनून पडद्यावर उतरलं. अक्षरसाहित्य एक पाऊल पुढे सरकलं.

 

साहित्यकृतींवरून बेतलेले चित्रपट नेहमीच पाश्चात्त्य प्रेक्षकांच्या पचनी पडत आलेत. अशा चित्रपटांनी ऑस्कर मिळवल्याची उदाहरणंदेखील उल्लेखनीय ठरतात. ओ गॉड, फिफ्टी’, ‘अ परफेक्ट डायव्होर्स’,‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरचा लेखक अवेरी कॉर्मन याचं सुरेख विश्लेषण करताना म्हणतो, ‘चित्रपटगृहाकडे येण्यापूर्वी कादंबरी लोकांनी वाचलेली असते, पडद्यावर जे नाटय़ घडत असतं त्या संदर्भातलं त्यांचं होमवर्क तयार असतं. त्यांना फक्त लिखित अक्षराशी पडद्यावरच्या घटना किती प्रामाणिक आहेत एवढंच पडताळून पाहायचं असतं. कधी कधी पडद्यावर दाखवण्यात आलेल्या घटना त्यातील नाटय़ व्हिज्युअल लिबर्टीच्या नावाखाली फिरवण्यात येतं. प्रगल्भ प्रेक्षक माध्यमातला फरक समजत असले तरी आम जनतेला (कॉमन पिपल) समजणं कठीण होऊन बसतं. ते कादंबरीतील घटना पाहायला आलेले असतात. त्यांचा अपेक्षाभंग किती प्रमाणात करायचा हे ज्या, त्या पटकथाकार-दिग्दर्शकांनी ठरवावं. ऑस्करमिळवलेल्या अशा चित्रपटांवर नजर फिरवली तर लक्षात येईल की लिखित साहित्याशी शंभर टक्के प्रामाणिक असलेल्या आणि माध्यमाचं स्वातंत्र्य घेत मूळ साहित्याशी फारकत घेत मूळ चौकटीला धक्का न पोहोचवता वेगळा परिणाम साधू पाहणारे असे दोन्ही चित्रपट परीक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत. तेव्हा सामान्य जनतेचे ठोकताळे ऑस्करच्या परीक्षकांना लागू होत नाहीत. पण अ‍ॅवॉर्ड मिळवणं आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणं, या नेहमीच दोन वेगळ्या गोष्टी ठरत आल्या आहेत.

 

क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर कॉर्मनने हे विचार मांडले होते, त्या वेळेसही कादंबरीचं महत्त्वच त्याने अधोरेखित केलं होतं. नॅचरली. लेखक या भूमिकेतून पडद्यापेक्षा साहित्यकृतीचं कौतुक त्याला अधिक असणार मात्र कादंबरी वाचताना दिसणार नाहीत, असे पैलू सिनेमाध्यमात प्रकर्षाने झळकतात आणि मग कादंबरीतली पात्रं मूळ साहित्यकृतीत लिहिलेल्या त्यांच्या प्रवृत्तीशी अधिक ठळकपणे जोडले जातात, याविषयी कॉर्मनसकट इतरही लेखक भाष्य करण्याचं टाळतात.

 

दस्तुरखुद्द क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरमध्ये वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्यानंतर टेड आणि जोआना या क्रॅमर पती-पत्नीच्या एकत्रित राहण्यातील प्रत्येक कृतीत विभक्तपणाचा एक पैलू झळकत जातो. दिग्दर्शक-पटकथाकार जोडीने तो पुढच्या प्रत्येक सीनमध्ये व्यवस्थित दर्शवलाय. डस्टिन हॉफमन, मेरिल स्ट्रीप जोडीच्या बॉडी लँग्वेजमधून तो प्रेक्षकांना इतक्या विविध थरांवर भिडत जातो की, त्यापुढे शब्दांची गरजच भासत नाही. कादंबरीतली दोन्ही पात्रं अधिक सजीव पातळीवर येऊन अंधारातल्या प्रेक्षकांशी सुसंवाद साधतात किंवा गॉडफादरमधला घोडय़ाच्या मुंडक्याचा प्रसंग अंधाऱ्या पडद्यावर तो अक्षरश: मेंदू बधिर करणारा ठरतो. (फ्रान्सिस फोर्ड कपोलाने त्याकरिता ख-या घोडय़ाचं तुटलेलं मुंडकं मागवलं होतं,) कादंबरीत त्याचा परिणाम किती आणि कसा येणार. चित्रपटाची परिभाषा लिखित साहित्यापेक्षा खूप वेगळी असल्याचं अशा काही पटकथांमधून जाणवत राहतं.

चित्रपट माध्यम, त्याचा प्रेक्षकवर्ग ही स्वतंत्र (आणि ब-याच उदाहरणांतून वाटावी अशी अनाकलनीय) गोष्ट आहे. आल्फ्रेड हिचकॉकचा सायकोरॉबर्ट ब्लॉक या कथानकावरून बेतला होता, कादंबरी वाचूनच हिचकॉकने त्यावर चित्रपट साकारायचं ठरवलं, तोपर्यंत ती कादंबरी सर्वसामान्य वाचकांपर्यंतदेखील पोहोचलेली होती, पण रहस्यपटांचा बादशाह हिचकॉक त्यावर चित्रपट करतोय म्हटल्यावर त्याविषयीची उत्सुकता इतकी ताणली गेली की, ‘सायकोच्या सेटवर पहिल्या दिवशी फिल्मच्या संपूर्ण युनिटने एकत्र जमून (हिचकॉकसह) प्रत्येकाने उजवा हात उंचावून प्रदर्शनापूर्वी क्लायमॅक्स उघड न करण्याची शपथ घेतली. कादंबरी बाजारात येऊनही हिचकॉकच्या सायकोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे मग फक्त लिखित साहित्याला सर्वेसर्वा मानणाऱ्या वाचकांची संख्या किती आणि जगभरात हिचकॉकच्या किंवा तत्सम जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांशी प्रामाणिक असणारा, त्यांच्या कलाकृतीवर फिदा होणारा प्रेक्षक किती? याला अपवाद म्हणून हॅरी पॉटर मालिकेचं उदाहरण देता येईल. लेखिका जे. के. रोलिंगला ओव्हर द इयर्स जितका वाचकवर्ग लाभला तितका प्रेक्षक पॉटरच्या पडद्यावरील कलाकृतींना मिळाला नाही. अक्षरमाध्यमात रोलिंगच्या प्रतिभेला शब्दांची किंवा पानांची मर्यादा लागू होत नाही, सिनेमाध्यमातील तीन-साडेतीन तासांत तेवढी संपूर्ण अक्षरकृती बंदिस्त करताना अनेक घटना उरकल्या जातात, तेव्हा त्यातला पंच निघून जातो, अशी त्याविषयीची सर्वमान्य बोंब आहे. हॉलिवुडमध्ये साहित्यकृती आणि पडद्यावरील आविष्कार यांचं दोन माध्यमांतील द्वंद्व सुरूच राहणार. जगभरचा वाचक श्रेष्ठ की, प्रेक्षक याचा फैसला अनंतकाळापर्यंत तरी होणार नाही. दोन्ही माध्यमांना एकमेकांवर कुरघोडी करताना पाहणं कधीही इंटरेस्टिंग ठरतं, मात्र गॉडफादरकिंवा गॉन विथ द विंडप्रमाणे दोन्ही माध्यमांनी एकमेकांशी समन्वय साधल्यास यलोअर दॅन गोल्ड.      

साहित्यकृतीवरून प्रेरित ऑस्करविजेते

 

१९३०-ऑल क्वायट ऑन वॉटरफ्रंट/ एरिक मारिया रीमार्क

 

१९३१-सिमारॉन/एडना फर्बर

 

१९३९-गॉन विथ द विंड/मार्गारेट मिशेल

 

१९४०-रिबेका/डॅफनी डय़ूमायर

 

१९४१-हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली/रिचर्ड ल्युलिन

 

१९४५-द लॉस्ट विकेंड/चार्लस जॅकसन

 

१९४९-ऑल द किंगज् मेन/रॉबर्ट पेन वॉरेन

 

१९५३-फ्रॉम हियर टू इटरर्निटी/जेम्स जोन्स

 

१९५६-अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज्/ज्युल्स वर्न

 

१९५७-द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय/पियर बाऊल

 

१९५८-गिगी/कोलेट

 

१९५९-बेनहर/ल्यू वॅलेस

 

१९६३-टॉम जोन्स/हेन्री फिल्डिंग

 

१९६७-इन द हीट ऑफ द नाइट/जॉन बॉल

 

१९६८-ऑलिव्हर/चार्लस डिकन्स

 

१९६९-मिडनाइट काऊबॉय/जेम्स लिओ हेरर्ली

 

१९७०-पॅटन/ओमर ब्रॅडली-लॅडिस्लॅस फगरे

 

१९७१-द फ्रेंच कनेक्शन/रॉबिन मूर

 

१९७२- द गॉडफादर/मारियो पुझो

 

१९७५-वन फ्लू ओव्हर द ककूज् नेस्ट/केन केसी

 

१९७९-क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर/अवेरी कॉर्मन

 

१९८०-ऑर्डिनरी पिपल/ज्युडिथ गेस्ट

 

१९८३-टर्म्स ऑफ एण्डियरमेंट/लॅरी मॅक्मर्टी

 

१९८५-आउट ऑफ आफ्रिका/कॅरेन ब्लिक्षेन

 

१९८७-द लास्ट एम्परर/पुयी

 

१९९१-द सायलेन्स ऑफ द लॅब्स/थॉमस हॅरीस

 

१९९३-शिंडलर्स लिस्ट/थॉमस केनेली

 

१९९४-फॉरेस्ट गम्प/विंस्टन ग्रूम

 

१९९६-द इंग्लीश पेशण्ट/मायकेल ऑनडॅटज्

 

२००१-द ब्युटीफूल माइंड/सिल्विया नासर

 

२००७-नो कंट्री फॉर ओल्ड मेन/कॉर्मेथ मॅकॉर्थी

 २००९-स्लमडॉग मिल्येनियर/विकास स्वरूप

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0