पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क | पुस्तकविक्या पावलो कोएल्यो

पुस्तकविक्या पावलो कोएल्यो

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

समीक्षकांनी ‘पुस्तकविक्या’ म्हणून हेटाळणी केली असली तरी पावलोची ‘दी अल्केमिस्ट’, ‘झहीर’, ‘दी पिलिग्रिमेज’, ‘द विच् ऑफ पोर्तोबेलो’ अशी त्याची पुस्तकं जवळपास ५०-६० भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत.

द अल्टिमेट गोल ऑफ अ रायटर इज टू बी रेड. मनी कम्स लेटर.’  आपण लिहितोय ते वाचलं गेलं पाहिजे, हेच लेखकाचं अंतिम ईप्सित असतं, पैसा वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत..

 

पावलो कोएल्योच्या मनात असं कोही तरी जगावेगळं सुरू असतं. अर्थात, केवळ पोर्तुगीज भाषेत लिहूनही जगभरच्या वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या पावलोला आता त्याच्या पुस्तकांच्या जवळपास साडेदहा कोटी प्रती संपल्यावर असं म्हणायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. समीक्षकांनी पुस्तकविक्याम्हणून हेटाळणी केली असली तरी पावलोची दी अल्केमिस्ट’, ‘झहीर’, ‘दी पिलिग्रिमेज’, ‘द विच् ऑफ पोर्तोबेलोअशी त्याची पुस्तकं जवळपास ५०-६० भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. सर्वाधिक अनुवादित लेखक म्हणून गिनीज बुकमध्येही त्याला मानाचं पान मिळालंय. असा लेखक आयुष्याच्या या टप्प्यावर असं कोहीबाही बोलून भाव खाऊन जाऊ शकतो.. पण पावलोच्या मनीचा भाव खरा आहे. म्हणूनच त्याने नेटचा डोकेबाज वापर करत स्वत:च्याच पुस्तकांचे विविध भाषांमधील अनधिकृत अनुवाद त्याच्याच साइटवर पायरेट क ोएल्योम्हणून उपलब्ध केले आहेत. लोकांनी वाचावं म्हणून माझी तडफड असते. पायरेटेड पुस्तकं घेण्यापेक्षा माझ्याच साइटवर चकटफू पुस्तकं उतरवून घ्या, चाळा, वाचा आणि जमलं तर पुस्तकच विकत घ्या, हा माझा उद्देश आहे.

 पावलोचा हा हेतू शंभर टक्के साध्य झाला आहे. माझ्या पुस्तकांचा खप वाढलाय.. आणि खरं सांगायचं तर संगणकाच्या पडद्यावर पुस्तक वाचणं, हे थकवणारं काम आहे. त्याचं प्रिंटआऊट कोढणं ही तर अधिकच खर्चिक भानगड. त्यापेक्षा कधीही वाचता येईल, कुठेही नेता येईल, सहज बाळगता येईल अशी पेपरबॅक घेतलेली बरी आणि नेटवर पुस्तक चाळल्यावर वाचक तेच करतात. माझी पुस्तकं आणखी खपतात,’ असं तोच डोळे मिचकावून सांगतो. पावलोची आणि आपली ओळख गेल्या काही वर्षातली. पण तो त्याआधीच ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, सिरिया, रशिया, अर्मेनिया अशा अनेक देशांमध्ये गाजतोय.

गोलमटोल चेहऱ्याचा, खुरटी पांढरी बोकडदाढी ठेवणाऱ्या हसतमुख पावलोचे वाचक, चाहते जगभर पसरले आहेत. त्याच्या पुस्तकांमुळे त्याला अनेक जण धार्मिक-अध्यात्मिक गुरू, मार्गदर्शक, प्रेरणादायी व्यक्ती म्हणून मानतात, हजारो जण त्याला त्यांच्या अडचणी कळवून मार्ग विचारतात, तर अनेक जण त्याच्या पुस्तकांमुळे आपल्याला एक नवी दिशा मिळाली, वाट दिसली असलं काय काय नेटवरून, पत्रानं कळवत असतात. पण पावलो हे सगळं उडवून लावतो. मी काय गुरूबिरू नाही. माझ्यावर सुफी पंथाचा, त्या विचारांचा प्रभाव आहे आणि तो माझ्या लिखाणातून ठळकपणे जाणवतो इतकंच. वाचक म्हणत असले तरी मी कोही कुणाचं आयुष्य बदललेलं नाही. जो कोही बदल झाला, तो होणारच होता. कदाचित माझ्या पुस्तकांमुळे तो एखादा खटका पडल्यागत वेगाने घडून आला असेल एवढंच..अशी प्रौढीही मिरवतो.

 पावलोचं हे म्हणणं खरंही असेल. त्याला लेखकच व्हायचं होतं एवढं नक्की. पण हे स्वप्न साकारण्यासाठी त्याला बरंच झगडावं लागलं. संपन्न घराणं, वडील अभियंते अशा वातावरणात पावलोनं लेखक व्हायचा विषय कोढल्यावर घरचे धास्तावलेच. लेखक व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे तरी तुला माहितीय का, असा प्रश्न आईने टाकल्यावर पावलोची शोधाशोध सुरू झाली. लेखकराव म्हणजे चश्मिष्ट आणि पिंजारलेल्या केसांची वल्ली, जिचा ध्यासविषय कुणीही समकालीन समजू शकत नाही, अशीच त्याची त्या वेळी समजूत झाली होती. शिकून मोठ्ठं व्हायचं सोडून पावलोने डोक्यात घेतलेलं हे खूळ कोढून टाकण्यासाठी त्याच्या घरच्यांनी त्याची रवानगी थेट मेंटल रुग्णालयात केली. विसाव्या वर्षी तिथून सुटका झाल्यावर पावलोने घरच्यांच्या दडपणामुळे विधी विद्यालयात प्रवेश घेतला, पण तेथे त्याचं मन रमणं अशक्य होतं. मग त्याची भटकंती सुरू झाली. दक्षिण अमेरिका, उत्तर आफ्रिका, मेक्सिको, युरोप पालथा घालतानाची त्याची ही वर्षे वादळी होती. सेक्स, ड्रग्ज आणि रॉक अँड रोलहेच माझं त्या वेळंच आयुष्य होतं, असं तोच सांगतो. पुढे ब्राझीलला परतल्यावर त्याने बंडखोर, डाव्या विचारसरणीची गाणी लिहिली. त्याबद्दल तत्कालीन लष्करी राजवटीने त्याला तीन वेळा तुरुंगातही धाडलं.

वयाच्या ३६व्या वर्षी मात्र आता बस झालं, असं म्हणत त्याने नव्या प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास होता स्पेनमधील एका धर्मस्थळाच्या दिशेने. ५०० मैलांच्या या प्रवासातच त्याला कोही अनुभव आले, साक्षात्कोर झाला आणि लेखक म्हणूनही दिशा सापडली. १९८६मधील या प्रवासातील अनुभवांमधूनच त्याचं द पिलग्रिमेजहे आत्मकथन साकारलंय. ते त्याचं दुसरं पुस्तक. ब्राझीलमध्ये त्याच्या या लिखाणाची फारशी कुणीही दखल घेतली नाही. पण आता फक्त लेखनसाधनाच, हे पावलोने मनाशी ठरवून टाकलं. त्यानंतर आलं ते द अलकेमिस्ट.अवघ्या ९०० प्रती छापलेल्या या कादंबरीला प्रारंभी फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण १९९०मध्ये फ्रान्समध्ये हे पुस्तक एकदम गाजू लागलं आणि पावलो बेस्टसेलर झाला. अलकेमिस्टआजही बेस्टसेलर लिस्टमध्ये हमखास दिसतं. ६७ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या पुस्तकाच्या जवळपास ७ क ोटी प्रती आजवर जगभर खपल्या आहेत. लेखकाला आणखी काय हवं असतं?

 

पावलोनं आता साठी ओलांडलीय. सहा महिने रिओ दि जानेरो येथे तर उर्वरित काळ फ्रान्समधील लुर्द धर्मस्थळाजवळ असलेल्या सेंट मार्टीन गावी असं त्याचं सुरू असतं. अलकेमिस्टवर लॉरेन्स फिशबर्न चित्रपट बनवतोय, पण पावलो त्यात ढवळाढवळ करत नाही. ही मंडळी माझ्या कथेकडे कुठल्या नजरेतून पाहतात हे मला निरखायचंय, असं म्हणत त्याने त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. व्हेरोनिका डिसाइड्स टू डायया त्याच्या कथेवर बनलेला चित्रपट अजून अमेरिकेत दिसायचाय. त्याच्या द विच् ऑफ पोर्तोबेलोवर बनवलेल्या फिल्म यूटय़ूबवर उपलब्ध आहेत.

 

त्याच्या लिखाणात धार्मिक विचार, गूढ तंत्रमंत्र, पंथ यांचा पसारा मांडलेला असतो. बऱ्याचदा पसरट असं त्याचं लिखाण असतं. चाहते वाचक त्याला अध्यात्मिक लिखाणाचाही दर्जा देतात. त्याच वेळी पावलो म्हणजे केवळ पुस्तकविक्या आहे, बाकी कोही नाही, अशी समीक्षक त्याची हेटाळणी करत असतात. पावलो मात्र त्याच्या लेखकपणावर समाधानी आहे. अनेक साध्यासुध्या माणसांमध्येही विलक्षण गोष्टी दडलेल्या असतात. ही माणसंही तुमचं जीवन उजळून टाकू शकतात. अपण फक्त अशा शुभसंकेतांकडे लक्ष देण्याची गरज असते. मी माझ्या लिखाणातून सर्वसामान्यांचं हेच असामान्यत्व सांगत असतो. त्यामुळे टीकाकारांनी कितीही हेटाळणी केली तरी माझी शैली मी बदलणार नाही. माझ्याबद्दल त्यांनी कितीही वाइट बोललं तरी चालेल. पण वाचकांबद्दल त्यांनी वाइट बोललेलं मला खपत नाही. माझी पुस्तकं आवडणारे जगातील सारे वाचक निर्बुद्ध आणि हे टीकाकार तेवढे शहाणे, अशी भूमिका घेणं कोही योग्य नाही..

 फक्त पोर्तुगीज भाषेत लिहूनही ६५ भाषांमध्ये अनुवादित होणा-या आणि सुमारे १५० देशांमधील वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या पुस्तकविक्याने वाचकांची अशी बाजू घेत स्वत:ला असं सेफ करणं हेही मजेशीरच म्हणायला हवं. नाही का?

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0