चटकदार लेखक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जे सत्य वाटतंय तसं असतंच असं नसतं, असं रॉबर्ट लुडलम त्याच्या लिखाणातून नेहमी दाखवायचा. त्याच्या लिखाणात ब-याच गफलती असतात, अविश्वसनीय, अतक्र्य, अशक्यप्राय घटनांची उतरंड असते, अशी टीका होऊनही त्याच्या कादंब-यांच्या सुमारे पन्नास कोटी प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत.

इंग्रजीतील थरारकथांची चटक लागली की, सुरुवातीच्या कोळात आपोआप अ‍ॅलिस्टेअर मॅकलिन, रॉबर्ट लुडलुम, फ्रेडरिक फ ोर्सिथ असे लेखक ओळखीचे होतात. लायब्ररीत, जुन्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये, पदपथांवर मांडलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्यात आपली नजर या लेखकांची पुस्तके शोधायला लागते, तिथला विक्रेताही आपली नजर काय शोधतेय त्यावर लक्ष ठेवून असतो.. मग एखादं पुस्तक उचलून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने विचारणा होते, त्याने सांगितलेल्या भावावरून थोडी घासाघीस होते, या हातातली नोट त्याच्याकडे सरकवली जाते आणि पुस्तक आपल्या हातात येतं. अर्थातच ते पुस्तक एका बैठकीत संपवलं जाणार असतं..

 

माझ्यासाठी एक कोळ असाच होता. कॉलेज, उभं राहण्याची धडपड असं सारं सुरू होतं आणि पुस्तकांसाठी पदपथांची, रद्दीच्या दुकानांची टेहळणी हा नित्यक्रम होता. त्याच वयात रॉबर्ट लुडलुमची पहिली (माझ्यासाठी पहिली) कादंबरी माझ्या हातात पडली असावी. कदाचित ती बोर्न आयडेंटिटी असावी. बस्स. लुडलुमनं मला झपाटून टाकलं. जगभर पसरलेल्या त्याच्या चाहत्यांमध्ये माझाही त्या क्षणी समावेश झाला. फोर कोही वेगळं घडलं नव्हतं. लुडलुमचं लिखाण वाचणाऱ्या प्रत्येकाला जशी किक बसते तशीच ती मलाही बसली होती इतकंच. नंतरच्या वर्षभरात लुडलुमचा मी जणू ध्यासच घेतला होता. नवीन पुस्तक घेणं मला परवडणारं नव्हतं, पण रद्दीत, पदपथावरून दिसेल तिथून लुडलुमची पुस्तकं मिळवून मी वाचून काढली. तीही जवळपास एका बैठकीत. अभ्यासासाठी रात्रीचा दिवस करणं जमलं नाही तरी पुस्तक वाचण्यासाठी मला ही किमया सहज जमायची, अजूनही जमते. लुडलुम वाचता-वाचताच मला त्याच्या कादंब-यांवर निघालेल्या चित्रपटांविषयी समजलं आणि असा लेखक आपण वाचतोय, माहिती आहे, याचं उगाचच अप्रूप वाटायला लागलं. कालांतराने आणखी ताकदीचे लेखक वाचनात आले, माझ्यापेक्षा सरस वाचक आणि समविचारी मंडळी परिचयाची झाली आणि इंग्रजी साहित्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास लक्षात आल्यावर आपण फक्त वाचक म्हणून हा आनंदानुभव अधाशासारखा घेत राहायचं असतं, याचंही भान आलं.

 

लुडलुम एकदम आठवला कोरण गेल्या आठवडय़ातच मला लुडलुम आणि बोर्न लिगसी अशा नावाची कादंबरी दादर सार्वजनिक वाचनालयात दिसली होती. लुडलुम कधीच गेलाय, त्याचं नवं पुस्तक येणं अशक्य आहे, हे माहीत असूनही उत्सुकतेने मी ती कादंबरी ओढून घेतली. ती लुडलुमचं नाव ब्रँडनेमसारखं वापरून एरिक व्हान लस्टबेडर याने लिहिली आहे, हे मुखपृष्ठावरच वाचल्यावर पान उलटणंही कठीण झालं. लुडलुमसारखं दुसरं कुणी लिहूच शकणार नाही, हे फोर सपक वाक्य आहे. पण, खरं आहे. तो भन्नाट लिहायचा. पहिल्याच पानापासून वाचकाला पुस्तकात गुंगवून ठेवण्याची लेखनशैली त्याला सहजसाध्य होती. द स्कार्लेट्टी इनहेरिटन्स, द ओस्टेरमन विकेंड, द जेमिनी कंटेन्डर्स, द चॅन्सलर मॅन्युस्क्रीप्ट, द मातारिज सर्कल आणि अर्थातच बोर्न कादंबरी मालिका.. यापैकी कुठलीही कादंबरी वाचायला सुरुवात केली की हाच अनुभव येतो. थरारकथांचं लिखाण त्याने तसं उशिराच सुरू केलं. त्याआधी तो थिएटरमध्ये होता. जवळपास २०० दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये त्याने काम केलं होतं. बहुधा त्याच्या वाटय़ाला वकील किंवा खुनी याच प्रकारच्या भूमिका यायच्या. कोही कोळ तो नाटय़निर्माताही होता. नाटकात प्रेक्षकांना गुंतवून ठेवायला उत्कंठा निर्माण करावी लागते, रहस्याची गुंफण असलेलं कथानक लागतं, याचा त्याला अनुभव होताच. तोच त्याने लिखाणातही वापरला. नाटक, मालिका, नट, निर्माता असं सारं सुरू असतानाच तो स्वत:ला लेखक म्हणूनही तपासून पाहत होता. १९७१मध्ये त्याने द स्कार्लेट्टी इनहेरिटन्स लिहिली, पण दहा प्रकाशकांनी त्याला नकारघंटा ऐकवली होती. हीच कादंबरी पुढे बेस्टसेलर झाली. त्याची पुढची कादंबरी होती द ओस्टेरमन विकेंड. तिच्यावर निघालेल्या चित्रपटात रुत्गर होअरने नायकाची भूमिका केली होती. मग दरवर्षी एक कादंबरी असं लुडलुमनं जणू ठरवूनच टाकलं.

 

ख-याखु-या घटनांमधून, आंतरराष्ट्रीय राजकारण, हेरगिरीच्या बातम्यांमधून लुडलुमला त्याचं कथानक दिसायचं. सीआयए, केजीबीसारख्या गुप्तचर संघटना, उद्योगसमूह, गुन्हेगार संघटनेच्या कचाटय़ात सापडलेले त्याचे कथानायक एकाकी लढा द्यायचे आणि सरतेशेवटी त्यांचा विजय व्हायचा, अशा स्वरूपाच्या कथानकाच्या ओघात लुडलुम वाचकाला जगभर फिरवून आणायचा. द बोर्न आयडेंटिटी, द बोर्न सुप्रिमसी आणि द बोर्न अल्टिमेटम या तीन कादंबऱ्यांनी लुडलुमला अफाट लोकप्रियता मिळवून दिली. जोनाथन रायडर (ट्रेवेन आणि द क्राय ऑफ द हॅलिडॉन) आणि मायकेल शेपर्ड (द रोड टु गंडोल्फ ो) या टोपणनावानेही त्याने कोही लिखाण केलं होतं. १२ मार्च, २००१ रोजी फ्लोरिडात त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. याच आठवड्यात त्याला जाऊन दहा र्वष होत आहेत, हे आता लिहिताना लक्षात येतंय. जे सत्य वाटतंय तसं असतंच असं नसतं, असं लुडलुम त्याच्या लिखाणातून नेहमी दाखवायचा. त्याच्या लिखाणात ब-याच गफलती असतात, अविश्वसनीय, अतक्र्य, अशक्यप्राय घटनांची उतरंड असते, अशी टीका होऊनही त्याच्या कादंब-यांच्या सुमारे पन्नास क ोटी प्रती आजवर विकल्या गेल्या आहेत. ३२ भाषांमध्ये त्याची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या पश्चात त्याच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांना मात्र बेस्टसेलर म्हणून भाग्य लाभलेलं नाही. त्याच्या सात कादंब-यांवर चित्रपट तयार झाले आणि त्यात मॅट डॅमन, मायकेल केन, डेन्झेल वॉशिंग्टन, लिओनार्दो डी कॅप्रियो यांच्यासारख्या नामवंतांनी काम केलं आहे. चॅनेलवरील लघुमालिका वेगळ्याच. कुठल्याही लेखकाला एवढं भाग्य अद्याप तरी लाभलेलं नाही.

 

त्याचं लिखाण कसं खिळवून ठेवतं, आकर्षित करतं याबद्दल द न्यूयॉर्क टाइम्समध्ये ख्रिस्तोफर लेहमान-हॉत यांनी लिहिलं होतं- लुडलुम दिवसेंदिवस वाईट लिहीत चाललाय की, आता त्याच्या खुब्या ओळखण्याइतकी वाचकांची नजर सरावलीय, त्याचं तंत्र इतकंपरिचयाचं झालंय, हे सांगणं कठीण आहे. पण, तरीही - हे कबूल करायला लाज वाटते - आपण वाचतच जातो. चित्तथरारक अ‍ॅक्शन, अद्भुतरम्यतेचं आकर्षण, वेगाने पुढे सरकणारं कथानक.. कशामुळे हे घडत असावं? उत्तर काहीही असो, लुडलुमचं लिखाण म्हणजे मस्त चापून जेवल्यावर समोर येणा-या रसमलाई, आइस्क्रीमसारखं आहे. आता जरा अतिच झालंय, खरंच नको, वजन सांभाळायला हवं, बापरे, हे जास्तच होईल, असं म्हणता म्हणता हात पुढे सरकतो आणि त्याचाही फडशा पडतो..

 

वाचकांचं लुडलुमबाबत तसंच होतं.. मी या भावनेशी एकशे एक टक्के सहमत आहे. बोर्न आयडेंटिटी मी पुन्हा वाचायला  घेतलंय.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0